फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसारख्या अॅप्सची मातृत्व संस्था असलेल्या ‘मेटा’ या कंपनीला दि. 14 एप्रिल रोजी अमेरिकेत न्यायालयाचा दणका बसला. ‘अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन’तर्फे ‘मेटा’ आणि संस्थापक मार्क झुकरबर्गविरोधात समाजमाध्यमांवरील एकाधिकाराचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. याचमुळे कंपनी दुभंगण्याची शक्यता आहे त्याविषयी...
Read More
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे
(Woman who accused Jaykumar Gore arrested in extortion Case) राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी एक कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडले. मंत्री गोरे यांनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचे महिलेने सांगतले होते.
मुंबई : “बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा,” असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी ‘सीआयडी’च्या अतिरिक्त महासंचालकांना दिले आहेत. त्याचबरोबर बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश बीड पोलीस अधीक्षकांना देताना, तातडीने फेरआढावा घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाजवळ आवाडा कंपनीचा ‘पवन
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या २६ वर्षांच्या आरोपीला अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून, त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुमितच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता २६ झाली आहे.
दिल्लीतील भजनपुरा येथील जिम मालकाच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सुमित गुर्जर असे मृताचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या १० सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमित गुर्जर रस्त्यावर एका मुलाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. काही वेळाने अचानक टोपी घातलेला मुलगा सुमितच्या जवळ येतो आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करू लागतो. घटनेनंतर सुमित जखमी होऊन नाल्यात पडला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी गुप्त माहिती समोर आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण हल्ला करू शकतो, अशी माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
ओडिशा उच्च न्यायालयाने सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात अकील अली आणि आसिफ अली यांची फाशीची शिक्षा रद्द केली. आरोपींना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती, पण ओडिशा उच्च न्यायालयाने अकिल अलीची निर्दोष मुक्तता केली आणि आसिफ अलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की तीन लोकांना सीआयएसएफच्या जवानांनी संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. कासिम, मोनिस आणि सोयेब अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीशी संबंधित आयपीसी कलमे लावण्यात आली आहेत.
केरळमधील कोझिकोड येथे एका महिलेवर बलात्कार आणि तिच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना घटनेच्या दोन वर्षांनंतर पकडण्यात आले. घटनेच्या दोन वर्षांनंतर पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आले कारण घटनेनंतर बलात्कार पीडितेची मानसिक स्थिती बिघडली होती.
न्यायालयाने दि. ३१ जानेवारी २०२४ बुधवारी २०२० साली दिल्लीत झालेल्या दंगलीत दोन दोषींना शिक्षा ठोठावली आहे. नूर मोहम्मद उर्फ नूरा आणि नबी मोहम्मद असे या आरोपींची नावे आहे. या खटल्यात सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, "जे गुन्हे घडले ते द्वेष आणि लालसेने प्रेरित होते." या खटल्यात नबी मोहम्मदने आधीच सुनावलेली शिक्षा पुरेशी मानून न्यायालयाने नूराला चार वर्षांच्या शिक्षा सुनावली.
श्रीरामपूर तालुक्यात महिन्याभरापूर्वी मुस्लिम मुलीशी विवाह करणाऱ्या तरुण दीपक बर्डेची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. बर्डे लग्नानंतर अचानक बेपत्ता झाला होता, त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार बेपत्ता तरुणाची हत्या झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परंतु, बर्डे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अंबोली गावातून बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्या प्रकरणी सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चार इसमांना रंगे हात पकडले आहे. वन विभागाने खरेदी करण्याच्या आवेशाने सापळा रचून या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान या आरोपींनी वन विभागाच्या कर्मचांऱ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चा
कल्याणमधील पीडित अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली असून रविवार, दि. १९ जून रोजी या तरुणीला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी शांततेत निषेध रॅली काढण्यात आली.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी असलेल्यांपैकी संतोष जाधव या एका आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
एका महिला वन परिक्षेत्र अधिकार्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक यांच्यावर दि. २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, अशा आशयाचे पत्र या महिला अधिकार्याने राज्याच्या मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
डोंबिवलीतील अल्पवयीन तरूणींवर सामूहिक बलात्कार करणा:या आरोपीच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या आरोपीना आज हजर करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच पोलिसानी चोविस तासात अटक केलेल्या आरोपीना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यात वाढ करुन पुन्हा 4 ऑक्टोबर्पयत पोलिस कोठडी वाढविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही घटना संवेदनशील असल्याने जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात आला आहे. या प्रकरणातील 21 आरोपींना 4 ऑक्टोबर र्पयत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे मैनक मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पीएनबी १३,८०० रुपयांना गंडा घातल्यानंतर मैनक मेहता हे परदेशात फरार झाले होते. मैनक मेहता हे नीरव मोदी यांचे मेहूणे आहेत २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मैहता दांपत्यांना अटक वॅारंट काढलं होतं.
शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या 15 आरोपींवरील आरोपनिश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवार, दि. २३ ऑगस्ट रोजी विविध गंभीर आरोपांसह १७ आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला. या मसुद्यावर विशेष न्यायालय लवकरच सुनावणी घेणार असून, त्यानंतर आरोपनिश्चिती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
सर्व आरोपींना पालघर सब जेलमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
ठाकरे सरकारने आरोपपत्र दाखल केलेच नाही!
आरोपी वाडा पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत होते अटकेत; वाडा पोलीस ठाणे राहणार बंद
आरोपीच्या संपर्कात आलेले ४४ जण क्वारंटाईन; इतरांचा शोध सुरु
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
न्यायालयासमोर केंद्र सरकारची ठाम भूमिका
आरोपी ढसाढसा रडला
दया याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगारांना १४ दिवसांचा अवधी दिला जातो, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टात सुनावणीवेळी सांगितले.
बारामुल्ला परिसरात जाळपोळ व असंतोष पसरविल्या प्रकरणी चार जणांना अटक