( Three killed in violent protests against Wakf in West Bengal ) “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘आधुनिक जिना’ म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते, आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालातील मुस्लीम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात,” अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी रविवार, दि. १३ एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
Read More
( Congress MP on Wakf Act ) ‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेतून “केवळ 15 मिनिटे द्या, आम्ही काय करतो पाहा,” असे देशविघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ‘सुधारित वक्फ कायदा’ देशभर लागू झाल्यानंतर त्याविरोधात जिहाद्दी मानसिकेतून आंदोलने करण्यात येत आहेत.
Waqf Amendment Bill विरोधात प.बंगालमधील मुर्शिदाबादेत ८ एप्रिल २०२५ रोजी निदर्शने दर्शवण्यात येत आहेत. यावेळी या निदर्शनादरम्यान २२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आरोपींची माहिती मिळवत आहेत. जंगीपुरचे पोलीस अधीक्षक, आनंद रॉय यांनी सांगितले की, या हिंसाचाराला घेऊन पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेता स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे.
( MP Jagdambika Pal Wakf reforms ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’विरुद्धच्या देशव्यापी आंदोलनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ (एआयएमपीएलबी)वर टीका केली आहे. तसेच या मुद्द्याचे राजकराण करत असल्याचा आरोपही त्यांनी बोर्डावर केला आहे.
शिमला : हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित संजौली मशीद ( Sanjauli masjid ) वादाची जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी आता दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिमला आयुक्त महापालिका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ऑल हिमाचल मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दिल्लीतील दोन मोठ्या मशिदींचे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाबर रोडवरील बच्चू शाह मशीद आणि टिळक मार्ग रेल्वे पुलाजवळील टाकिया बब्बर शाह मशीदचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी उत्तर रेल्वे प्रशासनाने १५ दिवसांची मुदत दिली होती. नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आत अतिक्रमण न हटवल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता.