‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ या ऋग्वेदातून आलेल्या मंत्राचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये श्रेष्ठ गुण, कर्म आणि स्वभाव विकसित करून इतरांनाही श्रेष्ठ मार्गावर नेले पाहिजे. याच पद्धतीने पुढे साऱ्या विश्वाला श्रेष्ठ आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. समग्र विश्वाचे अधिष्ठान धर्म व्हावे, यासाठी हिंदू समाज संघटित व्हावा, अशी भावना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांच्या या विचारांनी विदेशातील संघटित हिंदू समाज आज वाटचाल करताना दिसत आहे. आपल्या संस्कृतीला
Read More
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतातर्फे भव्य मंदिर स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार आहे. ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत “गाभाऱ्यात अंगण” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडेल. भाविकांना आपल्या सोयीच्या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन स्वयंसेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा किमान ११,००० मंदिरांमध्ये स्वच्छता उपक्रम पार पाडण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून “माझे मंदिर, माझी जबाबदारी” हा यामागचा प्रमुख संदेश आहे.
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीचा 400017 हा पिनकोड, सुमारे 10 लाखांहून अधिक स्थानिकांसाठी केवळ एक पत्ता नसून एक व्यथा बनली आहे. मानसिक कुचंबणा, सततची अवहेलना आणि इतरांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यामुळे स्थानिक धारावीकर दैनंदिन जीवनात मोठ्या दडपणाखाली असल्याचे दिसून येते.
कविता आणि समुपदेशन ते देखील व्यावसायिक समस्यांवर. अमोल पगारिया यांची ही यशस्वी कामगिरी दखलपात्रच...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (डुसू) निवडणुकीत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. अभाविपने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन प्रमुख पदे मोठ्या फरकाने जिंकली आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला येत्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने गोरेगावात शारदीय नवरात्रात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मसुराश्रम आणि संस्कार भारती(उत्तर पश्चिम समिती कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात हा कीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळात गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील मसुराश्रम येथे ही कीर्तने होणार आहेत.
'सुखकर्ता मोरया'ने जिंकली भाविकांची मनं, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो तो बाप्पाच्या सेवेतील सेवेकऱ्यांमुळे आणि त्यांच्या अविरात श्रमामुळे. चिंचपोकळीचा चिंतामणी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या आपल्या या बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या दर्शनाची ही अनुभूती सुखाची ठरते ती कार्यकर्त्यांमुळे. चिंतामणीच्या चरणी मागच्या दोन दशकाहून अधिक काळ अविरत सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग मोरे उर्फ पांड्या
दैनिक मुंबई तरुण भारत तर्फे दिनांक ९ सप्टेंबर रोजी वनवासी कल्याण आश्रम संचलित चिंचवली ता. पनवेल, जि. रायगड येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे. उत्सवाबरोबरच सामाजिक भान जपणारे मंडळ अशी ओळख आहे चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची.
मागील पाच वर्षांपासून सतत दुरवस्थेच्या चर्चेत असलेल्या चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रवाश्यांना आणि चालकांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोटी -कामण रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाची २२९ कोटी ११ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून, येत्या दोन महिन्यांत कॉंक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे दररोज हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता.
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना सोशल मीडियाचं वातावरण वेगळ्याच मुद्द्याने तापलेलं पाहायला मिळत आहे. अर्थातच त्याला पार्श्वभूमी गणेशोत्सावाचीच आहे. रीलस्टार अथर्व सुदामेच्या हिदूं-मुस्लीम ऐक्यवादी रीलमुळे एकच संताप पाहायला मिळाला. आणि काही वेळातच त्याने आपल्या खात्यावरुन तो व्हिडीओ हटवला. पण त्यामुळे हिंदू सणांमध्ये मुस्लीम असणं आणि ते किती समावेशक आहेत या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागली. सोशल मीडिया कन्टेट क्रियेटर्सवर आक्षेप घेणं खरंच चूक आहे का... याविषयी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अभिराम भड
संसदेत ‘नवीन आयकर विधेयक 2025’ मंजूर होऊन भारताच्या आयकर कायद्यात मोठ्या स्वरूपात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या विधेयकाद्वारे आयकर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि करदात्यांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. व्यक्ती आणि कंपन्यांसाठी कर अनुपालनाच्या प्रक्रियेतील ताण कमी करण्यासाठी आणि कर कायद्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ट्रम्प यांच्या आयातशुल्क वाढीच्या मुद्द्याने पुन्हा चर्चा रंगली आहे. त्याची कारणे, परिणाम यांची चर्चा झाली.पण, यानिमित्ताने ट्रम्प यांचे असे विक्षिप्त वागणे भारत-अमेरिका संबंधांना ठेच पोहोचवू शकते का? खरच ट्रम्प यांना असे अधिकार तेथील संविधानाने दिले आहेत का? भारताने आजवर संयम दाखवला असून, संयत उत्तरेही दिली आहेत. पण, ट्रम्प यांनी आधी चीनची जशी परीक्षा घेतली, तशीच ते भारताची परीक्षा घेत आहेत का? हे दबावतंत्र नेमके कशासाठी? यामागील समीकरणे नेमकी काय? चांगला मित्र इतका खडूस का झाला? आणि आता याचे भविष्य काय? य
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कालावधी वाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभणार आहे. बसस्थानके, बस आगार, तसेच महानगरांसह, अन्य नागरी भागात प्रव
हिंदूत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते. परंतू, त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील बाळाचा जन्मदात्या आईने दहा हजारात सौदा केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आई असूच शकत नाही...ही तर सौदागर अश्या तीव्र भावना मुरूमच्या स्थानिकांनी दिसून आल्या. बाळावर बेकायदेशीरीत्या दत्तक प्रक्रिया करत सौदागर आईने आपल्या बाळाचा सौदा केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, बाळाच्या आजीने या गैर प्रकारावर आवाज उठवत हा प्रकार उघडकीस आणला.
टिळकनगर बाल विद्या मंदिर (प्राथमिक विभाग)चा अमृतपुत्र गौरव समारंभ म्हणजेच मागच्या वर्षी पहिली ते चौथी या इयत्तांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला.
वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा
मुंबईतील एका नामांकित शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोक्सो(POCSO) अंतर्गत अटकेत असलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नुकताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात हरित सेतू व पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबविण्यासाठी हरित कर्जरोख्यांतून (ग्रीन बॉण्ड) सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. त्यानिमित्ताने नेमकी ‘ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड’ ही संकल्पना आणि त्याचे गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
समोर एखादा दिग्गज खेळाडू किंवा स्पर्धक असेल, तर तुमचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नव्या रणनीतींची आवश्यकता असते. ‘एअरटेल’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सध्या तशीच पद्धत अवलंबत आहे, त्याचे हे आकलन.
शिक्षकांना त्यांची हक्काची दस्तऐवज आता मिळणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शाळांना आदेश दिले. या निर्णयाचा फायदा मुंबईतील उत्तर पश्चिम दक्षिण शिक्षण निरीक्षक जिल्ह्यासह ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
एरव्ही आपण असे वाचतो की, कामवासना आटोक्यात ठेवावी, त्यात वाहत जाऊ नये आणि इथे तर रेतस वेगाचे धारण केल्याने शारीरिक-मानसिक त्रास होतात आणि आवेगाचे धारण करू नये, असे म्हटले आहे. यातील कुठले बरोबर, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
(Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध १६७० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात वैष्णवीाचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपावरुन आरोपींविरोधात बावधन येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना राज्यातील ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपाहारगृह, भूमी खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. याबद्दल स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
‘ग्लोबल साऊथ’मध्ये भारत एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून पुढे असून, आपली भूराजकीय ताकद, विकासाचे मॉडेल आणि मुत्सद्देगिरी वापरून राष्ट्रीय हितसंबंध आणि सामूहिक आकांक्षांना अनुरूप असे परिणाम साधले आहेत. ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेतही ते प्रामुख्याने दिसून आले. तेव्हा या परिषदेतील भारताच्या भूमिकेचे आकलन करणारा हा लेख...
दत्ताजी भाले सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे किन्नर समुदायाच्या हितासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समुदायाच्या समस्या, उपाययोजना आणि भावी कामकाजावर चर्चा झाली. याच वेळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर “किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांत” या नव्या परिषदेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात कुठली गोष्ट, कधी केव्हा कशी ट्रेडिंग होईल, याचे काही नेम नाही. दहा वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला चित्रपट आज काही लोकांना ‘क्लासिक’ वाटू शकतो. कधीकाळी दुर्लक्षित झालेलं गाणं एकदम सगळ्यांच्या ‘फीड’वर ऐकू येतं, तर कधी लोकं कलाकाराच्या नावाने उसासे टाकतात. अगदी हीच गत झाली आहे, सध्या चर्चेत असणार्या लाबुबू बाहुल्यांची. मागच्या काही काळापासून समाजमाध्यमांवर एक बाहुली अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. ही बाहुली सर्वसामान्य वाटत असली, तरीसुद्धा तिच्या डोळ्यांमुळे ती विचित्र वाटते. या बाहुलीच
; प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावेळी दक्षता घेण्याचे निर्देश महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन, त्यात प्रकल्पबाधितांना घरे दिल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये नोकरीत आदिवासी समाजाला वाढीव आरक्षण देण्यासंदर्भात नुकतीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यावर चर्चा या बैठकित करण्यात आली
एसटी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एसटी महामंडळाने सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पद्धतीने विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एसटी महामंडळला उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. शनिवार,दि.२७ जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी मह
गेल्या दशकभरात देशात खादी ग्रामोद्योगाचा सर्वांगीण विकास झाला असून, खादी ग्रमोद्योगाने तब्बल 347 टक्के प्रगती केल्याची माहिती सरकारने दिली आहे. 2024-25 या काळात खादी ग्रामोद्योगाने 1 लाख, 16 हजार, 599 कोटी रुपये मूल्याचे उत्पादन नोंदवले आहे. तुलनेने 2013-14 मध्ये खादी ग्रामोद्योगाचे उत्पादन 26 हजार, 109 कोटी इतके होते.
जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पतंजली परिवार युवा भारत आणि नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इंटिग्रेटेड योगसाधना चिकित्सक शिबिर आयोजित करण्यात आले. योगऋषी रामदेव यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
शनिवार दि. १४ जून रोजी इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रातील फेज 14 वरील प्रमुख प्रक्रिया युनिटवर हवाई हल्ला केला. यामुळे 12 दशलक्ष घनमीटर गॅस उत्पादन अंशतः थांबवावे लागले. हा हल्ला इराणच्या तेल आणि वायू पायाभूत सुविधांवर इस्रायलचा पहिला थेट हल्ला होता, जो क्षेत्रीय तणावात वाढ आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील अस्थिरता दर्शवतो.
गेलेे काही आठवडे आपण बलुचिस्तान, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत इत्यादी पाकिस्तानी प्रांतांमधल्या बंडाळ्यांची स्थिती समजून घेत आहोत. एक बलुचिस्तान सोडला, तर इतर प्रांत स्वबळावर स्वतंत्र होऊ शकतील, अशी स्थिती नाही. इकडे भारताने हाणलेल्या जबर तडाख्याने पाकिस्तान घायाळ झालाय, असे भासते. पण, तिकडे पाकिस्तानी सेना नेतृत्व ‘आयएसके’ला पुढे करून बलुचिस्तानला तर चेपतेच आहे, पण अफगाणिस्तानावरही वरचढ होऊ पाहत आहे. जाणून घेऊया हा सत्तेच्या सारी
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल वाढत असतानाच डिझेलसह इतर आवश्यक घटकांच्या दरवाढीमुळे शेती करणे अधिकच कठीण झाले आहे. बैलजोडीच्या किंमती लाखोंमध्ये पोहोचल्यात, तर मजुरी दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करण्याचा खर्च परवडेनासा झाला आहे. यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी व खर्च अधिक होत असल्याने अनेकांना तोटा सहन करावा लागत आहे.
जपानला मागे टाकून जगातील चौथ्या मोठ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था म्हणून भारतासह भारतीयांची मानही अभिमानाने उंचावली. पण, नीति आयोगाने केलेल्या या घोषणेनंतर अर्थशास्त्रीय पातळीवर काही प्रश्नही उपस्थित केले गेले. देशाचा जीडीपी वाढला, पण अन्य देशांच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमीच असल्याचा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आला. आर्थिक आघाडीवरच्या या घडामोडीचे राजकीय पडसाद उमटणे अपेक्षित होतेच आणि राजकीय चष्म्यातून या घटनेकडे पाहात, या विधानाच्या सत्यासत्यतेबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. तेव्हा सा
संस्था लहान असो अथवा मोठी, कर्मचार्यांचे वेतन, पगारवाढ याचा गांभीर्याने विचार करणे, हे व्यवस्थापनासाठी क्रमप्राप्तच. वाढती महागाई, त्यामुळे वाढणारे खर्च आणि नोकरदारांच्या खिशावरील ताण पाहता, पगारवाढ ही आजच्या काळात अनिवार्यच. त्यानिमित्ताने यासंबंधीचा संक्षिप्त आणि वर्तमान यांचा आढावा घेणारा हा लेख...
जर्मनी एकेकाळचे बलाढ्य राष्ट्र. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात या राष्ट्राचा दबदबा वादातीत. मात्र, दुसर्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीने संरक्षणसिद्धतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. सातत्याने शांततापूर्ण नीतीला पाठिंबा दिल्याने आज जर्मनीतील जनतेची सैन्यात भरती होण्याची मानसिकता नाही. मात्र, रशिया-युक्रेन युद्धानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.
take a look at the province of Sindh गेल्या आठवड्याच्या लेखात आपण पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रांत कसा स्वतंत्र होऊ पाहात आहे, याचा आढावा घेतला होता. आता खबर घेऊया सिंध प्रांताची. गुलाम मूर्तझा सय्यद किंवा जी. एम. सय्यद या नावाने जास्त परिचित असलेल्या सिंधी मुसलमान नेत्याने 1972 सालीच ‘जिये सिंध तहरीक’ अशी चळवळ सुरू करून वेगळ्या ‘सिंधुदेशा’ची मागणी केली होती. 1971 साली बंगाली भाषिक मुसलमानांचा ‘बांगलादेश’ निर्माण झाला. तसाच आम्हा सिंधी भाषिक मुसलमानांना वेगळा ‘सिंधुदेश’ हवा, अशी त्यांची मागणी होती. पाकिस्ता
Reduced urban migration of industrial workers for livelihood and increased employment opportunities in rural areasसध्या ‘कोरोना’ पुन्हा काहीसे डोके वर काढत असल्यामुळे, पूर्वानुभवातून प्रशासनासह नागरिकही सतर्कता बाळगताना दिसतात. कारण, ‘कोरोना’चे केवळ मानवी आरोग्यावर नाही, तर सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षणीय परिणाम झाले. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे, औद्योगिक कामगारांचे रोजीरोटीसाठी घटलेले शहरी स्थलांतर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या रोजगाराच्या संधी. तेव्हा, या परिवर्तनाची कारणमीमांसा करणारा हा
Vrushali Maral who works through the Pimpri-Chinchwad Senior Citizens Federation समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या विकासासाठी ‘पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघा’च्या माध्यामातून कार्यरत असलेल्या वृषाली मरळ यांच्याविषयी...
परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेले आहेत. तसेच, १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि. 5 मे रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणार्या मालवाहतुकीवर बंदी घातली. त्यानंतर कांद्याच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दि. 6 मे रोजीपासून मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू झाल्याने लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये कांद्याची थेट निर्यात पुन्हा वेग घेत आहे. आतापर्यंत 350 कंटेनरद्वारे 90 हजार क्विंटल (30 हजार मेट्रिक टन) कांद्याची निर्यात झाली. त्यामुळे भारतीय कांदा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात गाजू
पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्य