Vote Jihad लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी (Vote Jihad) बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आ. आसिफ शेख यांनी शुक्रवार, दि. १४ मार्च रोजी केला. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read More
(Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
‘सूड सूड’ म्हणालात की, सोड सोड म्हणालात साहेब? आम्हांला वाटले, तुम्ही ‘सूड... सूड... सूड’च म्हणालात. आपल्या पदाधिकार्यांना वाटले की, तुम्ही ‘सोड सोड’ म्हणालात. त्यामुळे पुण्याच्या पदाधिकार्यांनी, मोठ्या संख्येने आपला उबाठा गट सोडला साहेब. साहेब आपले ते पुण्याचे लोक, सूड घेण्यासाठी शिंदेगटात जात आहेत का? ते कोणाचा सूड घ्यायला तिकडे गेले साहेब? हो आपले विश्व प्रवक्ते दूरदृष्टीचे संजय दोनवेळा पुण्यात गेले होते. त्याचा परिणाम हा असा झाला की, आपले लोक शिंदेगटात हौसेने गेली.
मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा प्रकरणाला आता नवे वळण आले असून हा पैसा दहशतवादी कारवाया आणि कट्टरवादी संघटनांना देण्यासाठी वापरला गेल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आला आहे. ऑपरेशन 'रिअल कुबेर' अंतर्गत तपास करत असताना २२५ प्राथमिक बँक खाती दहशतवादी निधीशी संबंधित असल्याचा ईडीला संशय आहे.
मालेगाव हे आता बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले असून हा वोट जिहाद भाग दोन असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्यांनी मालेगाव येथील तहसीलदार आणि महापालिका कार्यालयांची भेट घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
(Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : मलबार हिल मतदार संघातीचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Lodha ) यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंगल प्रभात लोढा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली. आज भारताचा विश्वगुरु म्हणून उदय होत असताना या प्रवासात संत शक्ती आणि सज्जन शक्तीचे योगदान उल्लेखित करण्याचा उद्देश मंगल प्रभात लोढा यांनी साध्य केला.
मालेगाव वोट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे पैसे वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
लखनऊ : बांगलादेशात हिंदू, दलित, अल्पसंख्यांकांवर अन्याय होताना दिसून येत आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत 'मुस्लिम मतांसाठी' काँग्रेस गप्प असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. शेजारच्या देशात एवढं तणावजन्य वातावरण असतानाही काँग्रेस ( Congress ) केवळ मुस्लिम मतांकडेच आपले लक्ष केंद्रित करीत आहे यातून त्यांनी काँग्रेसचा स्वार्थीपणा समोर आणून जनतेला जागरुक ठेवण्याचा प्रयत्न केला.
मालेगाव वोट जिहाद प्रकरणी नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापकांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत २५० कोटींचा बेनामी आर्थिक व्यवहार झाला असून यातील १२० कोटी रुपयांचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
vote jihad भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्होट जिहाद करत काही कट्टरपंथींच्या बँक खात्यात ८०० कोटी रूपये हस्तांतरित केले जात असल्याची माहिती दिली आहे. मालेगाव येथे व्होट जिहादच्या प्रकरणाची पोलखोल करत याप्रकरणात लक्ष घातले. त्यांनी X ट्विटवर याप्रकरणाची माहिती शेअर केली आहे. यामध्ये एक-दोन नाहीतर तब्बल २१ बँक खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप महायुतीचे आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांचा ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शनिवारी शासकीय विश्रामगृहात हा सत्कार सोहळा पार पडला.
उद्धव ठाकरेंचा विजय म्हणजे वोट जिहाद, लव्ह जिहाद आणि लँड जिहादचा विजय आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी मुलुंड येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी उबाठा गट वोट जिहादमुळे वाचल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ( MVA ) ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० वॉल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजसत्तेच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात देताना, नागरिकांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील मतदानही विक्रमी झाले. निवडणूक म्हटली की, अनेक डावपेचांची जशी चर्चा असते, तशीच ती काही पॅटर्न्सचीदेखील असते. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील असेच अनेक ‘पॅटर्न’ पहायला मिळाले. त्यांपैकीच एक नवीन पॅटर्न म्हणजे ‘धारकरी पॅटर्न’ ( Dharkari pattern ) होय. या पॅटर्नने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखली आहे, तर काही पडणार्या हिंदूनिष्ठांच्या जागा निवडून दिल्याची चर्चा आ
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नऊपैकी सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) पुन्हा तळपले असून मतदारांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून त्यामध्ये महायुतीने निर्भेळ यश संपादन केले आहे. लोकसभेतील निवडणुकांमध्ये ‘व्होट जिहाद’चा मुद्दा अग्रणी होता. ठिकठिकाणी मुस्लीम मतदार करत असलेल्या एकगठ्ठा मतदानाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. या पार्श्वभूमीवर अनेकदा हिंदुंविरोधात वादग्रस्त विधाने करत मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या ‘ऑल इंडिया-मजलीस-ए-इतेहाद्दुल-मुसलमिन’ अर्थात ‘एमआयएम’च्या ( MIM ) कामगिरीकडेही लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून ‘एम
लांगूलचालन करून सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणार्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेस-शरद पवार आणि उबाठा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला असून, ६०च्या आतच त्यांचा डाव आटोपला आहे. भाजपने ‘न भूतो’ अशी विक्रमी कामगिरी करीत भल्याभल्यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या ( BJP ) या महाविजयाची पाच कारणे...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघामध्ये बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मतदान यंत्रे स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारांनीही मतमोजणीच्या ( Vote Counting ) कक्षात प्रत्येकी २२ पोलिंग एजन्ट नेमण्याची लगबग सुरू केली आहे.
घाटकोपर ( Ghatkopar ) पूर्व येथील मतदारांशी संवाद : महापालिका शाळा घाटकोपर पूर्व विधानसभा
(Gondia) गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव भागात एका महिलेने पतीचा मृत्यू झाला असतानाही मतदानाचा हक्क बजावल्याची घटना समोर आली आहे. येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे मतदानाच्या दिवशीच बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. मात्र दुःखात असलेल्या माऊलीने आणि घरातील सर्व सदस्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीत पृष्ठभागाखाली असलेला धार्मिक मतदानाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आता उघडपणे समोर आला आहे. काही मुस्लीम संघटनांची मजल मतांच्या बदल्यात बेकायदा आणि अवाजवी मागण्या करण्यापर्यंतही गेली. एकप्रकारे राज्यातील हिंदू मतदारांना हे आव्हान दिले गेले. गंमत म्हणजे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणार्या पक्षांनीच या उघड जातीयवादी व घटनाविरोधी आवाहनाला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाला वाचविण्यासाठी हिंदू मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची गरज आहे. मतदान करणे हे क
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ही विकासाच्या मुद्द्यांबरोबरच ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी प्रकर्षाने दिसून आली. त्यानिमित्ताने अलीकडच्या काळात देशभरात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता, हिंदूंची सामाजिक-राजकीय परिघातील एकता, हिंदूंचे हिंदुत्ववादी पक्षांना उत्स्फूर्त मतदान का आवश्यक आहे, त्याची प्रचिती यावी. अशाच हिंदू एकतेचा गजर अधोरेखित करणार्या वर्तमानातील घटनांचे हे प्रतिबिंब...
आज मतदानाचा दिवस. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये स्वत:ला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणवणार्यांची तत्त्वनिष्ठा आज धर्मांधांच्या समोर लाचार झालेली पाहिली आहे. राज्यात धर्माच्या नावाने धर्मांधांनी उच्छाद मांडला असताना, अनेक ‘मी मी’ म्हणवणारे मतांच्या भिकेसाठी धर्मद्रोह करत आहेत. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ हा विचार या राज्याच्या विचारधारेचा पाया आहे आणि काशीचा विश्वेश्वर सोडवा, हा इथल्या राजाचा आदेश. मात्र, हिंदूंमधील अनेक संप्रदाय, पंथ जिथे गुण्यागोविंदाने नांदले, त्या राज्यात आज जातीचे विष का
विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांशी संपर्क साधण्याचा योग आला. चंद्रपूर, नागपूर, अमरावती अशा तीन जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतील नागरिकांना भेटले. खोटे ‘नॅरेटिव्ह’, फुटीरतावादी परिस्थिती तयार करणे आणि लोकांना भ्रमित करणे, असे उद्योग तिथेही राजरोसपणे सुरु आहेत. त्यातही काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्या मतदारसंघांमध्ये तर काय विचारता सोय नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भातील हिंदूंचे मत काय, याचा मागोवा ...
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान ( Voters ) झाले आहे.
ठाणे : २०१९ साली जनमताचा अनादर झाला, हे मतदार विसरले नसून राज्याची दशा कुणी केली आणि राज्याला दिशा कुणी दिली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे कल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या जोरावर महाराष्ट्रातील मतदार महायुतीलाच बहुमताने निवडून देतील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यात व्यक्त केला.
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढाईत या खेपेला मनसेही रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. ठाणे ( Thane ) महापालिका क्षेत्रात येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी - पाचपाखाडी, ओवळा - माजिवडा आणि मुंब्रा कळवा या चार विधानसभा क्षेत्रात बुधवारी (ता.२० नोव्हे.) मतदानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साह
(Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
(Vasant Gite) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच व्होट जिहादच्या मुद्द्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ आमदार नितेश राणेंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केला आहे.
मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जाती-जातींमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून धार्मिक धृवीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच ‘ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डा’चा प्रवक्ता सज्जाद नोमाणीने ‘व्होट जिहाद’च्या ( Vote Jihad ) आवाहन केल्याने, या आवाहनाला सडेतोड उत्तर
२०० कोटींचा आर्थिक व्यवहार! मालेगावमध्ये वोट जिहादचा डाव Vote Jihad | Maha MTB
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, हा पैसा ‘उलेमा बोर्ड’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Vote Jihad) शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
मुंबई : मी महाराष्ट्रभर दौरे करत आहे. त्यामुळे मला राज्यभरातून सकारात्मकता जाणवत आहे. विशेषत: महिला मतदारांमध्ये अधिक दिसत आहे. पूर्वी आमच्या सभांना ७० टक्के पुरुष असायचे आणि महिला कमी असायचा. पण, आता महिलाही जवळपास ५० टक्के दिसून येत आहेत. ही निवडणूक मोठी लढाई आहे. पण, आम्ही बहुमताने सरकार बनवू, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला...
मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार ( Voters ) जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. मालेगावमध्ये २०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून त्यातील सव्वाशे कोटींचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचे त्यांनी याआधी उघड केले होते. त्यानंतर शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
vote jihad च्या आरोपावर अंमलबाजावणी करत ईडीने महाराष्ट्र आणि गुजरात येथे छापे टाकले आहेत. राज्यातील एका कट्टरपंथी मुस्लिम व्यवसायिकावर १२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर हा छापा टाकण्यात आला आहे. या व्यवसायिकाने अनेक लोकांचे बँक खाते घेऊन हा व्यवहार केला होता. हा पैसा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट जिहादसाठी वापरला जात असल्याचा आरोप आता भाजपने केला होता.
मुस्लिमांच्या ‘व्होट जिहाद’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे धर्मयुद्ध छेडले आहे. मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी ‘उलेमा’च्या १७ मागण्या मविआच्या नेत्यांनी मान्य केल्या आहेत. बहुसंख्या हिंदूंना जातीपातीत विभागून मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठीचे हे षड्यंत्र म्हणूनच हाणून पाडण्याची गरज तीव्र झाली आहे.
(Narendra Mujumdar) "सशक्त समाज आणि देश घडवण्यासाठी लोकांनी स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण हेच परिवर्तनाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल असेल.", असे म्हणत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत प्रचार प्रमुख नरेंद्र मुजुमदार यांनी उपस्थिताना १००% मतदानासाठी आवाहन केले.
(ED) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशविरोधी ‘व्होट जिहाद’चा कणा मोडून मालेगाव, नाशिक आणि मुंबईसमध्ये छापेमारी केली आहे. यावेळी ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा बुरखा फाडण्यात आला आहे
मी, मैत्रेय दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवाराच्या वतीने, 'तरुण भारत' सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. काही आध्यात्मिक मर्यादा असल्यामुळे स्वतः प्रत्यक्ष हजर राहता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु आजचा विषय हा सद्य वेळेस अनुरूप आणि अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने, आपले मत मांडण्यापासुन स्वतःला रोखता आले नाही.
( Amit Shah )धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देणार नाही, असे स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकात सुधारणा करणार असल्याचा पुनरुच्चार मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी केला. केवळ 'व्होट बँके'च्या राजकारणासाठी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या विधेयकाला विरोध करीत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
मुंबई : दि. २० नोव्हेंबर रोजी होणार्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क ( Voting ) बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.
मालेगावमध्ये २५० कोटींचा बेनामी आर्थिक व्यवहार झाला असून यातील १२० कोटी रुपयांचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणीही केली आहे.
मुंबई : यंदाच्या लोकसभा ( Lokasabha ) निवडणुकीत जिहादचा एक नवीन प्रकार मुंबई आणि महाराष्ट्राने अनुभवला. ‘व्होट जिहाद’चा नारा मुंबादेवी, भेंडी बाजार, बेहरामपाडा, नागपाडा, मुंब्रा, मीरा रोड येथील नयानगर, मालेगाव अशा विभिन्न वस्त्यांमध्ये दिला गेला. मोठमोठ्या सभा, मशिदी आणि मदरशांमध्ये संमेलने, मेळाव्यांतून ‘व्होट जिहाद’चे नारे दिले गेले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनमत बदलण्यासाठी ‘व्होट जिहाद’चे कारस्थान महाविकास आघाडीकडून रचले जात आहे. त्यामुळे भविष्यात भारत एकसंध ठेवायचा असेल, तर जागरूक राहून मतदान
( Congress ) काँग्रेसला मतदान करण्याकरिता जारी करण्यात आलेल्या एका कथित फतव्याची प्रत काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमाने चव्हाट्यावर आणली होती. दुबई अमिराती मधील मुस्लीम संघटना आणि असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम संघटनेंकडून हा फतवा जारी करण्यात आला होता.
ठाणे : “लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता व्होट जिहाद... यामागे प्रचंड मोठी विदेशी ताकद आहे. तेव्हा, सकल हिंदू समाजाने एकत्र व्हायला हवे. या ‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल,” असे परखड मत ज्येष्ठ संपादक, राजकीय-सामाजिक विश्लेषक, व्याख्याते, डॉ. उदय निरगुडकर ( Uday Nirgudkar ) यांनी व्यक्त करून या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
( Mumbai )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला असून येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २० नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.