महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगाने दि. १७ फेब्रुवारी रोजी दिला. आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. त्यामुळे पक्ष चिन्ह, पक्षप्रमुख पद आणि पक्षाचे नाव ही उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन अद्याप ही उद्धव ठाकरेंकडेच आहे. पंरतू शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याच
Read More
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पक्षसावरण्यासाठी एक पाऊल पुढे येत असताना, पक्षातील महिला नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे समजते. शिवसेनेतील महिला पदाधिकारी आशा मामेडी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मामेडी या शिंदे यांच्या पक्षात जाण्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडीतील गटबाजी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसतो.
उ. बा. ठा. गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी पक्षातून बाहेर पडत बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला आहे. अलीकडेच त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते. त्यामुळे पद असताना देखील पक्ष का सोडला असा प्रश्न असताना त्यांनी माध्यमांसमोर कारण स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी पक्षातील महिला नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं म्हणणाऱ्या महिला नेत्याला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.