राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून, उद्योगांना सवलत देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.
Read More
दररोजच्या वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी, यासाठी कळवा खाडीपुलावर नवीन तिसरा पूल उभारण्यात येत आहे. ठाणे-कळवा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या तिसर्या पुलाच्या पोलीस आयुक्तालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट उलटून सप्टेंबर सरत आला तरी अद्याप नवीन कळवा पुलाच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळालेला नाही.
मविआ सरकार कोसळल्याने मंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागलेल्या जितेंद्र आव्हाडाना आता कळवा खाडी पुल खुला करण्यासाठी जाग आली आहे.
घोडबंदररोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भाजपने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढला. घोडबंदर रोडवरील रहिवाशांबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेला पाणीटंचाईचा जाब विचारला.
ठाणे मनपावर दि. ६ मार्च रोजी प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. प्रशासकीय राजवटीमुळे वृक्ष प्राधिकरण समितीही अस्तित्वात नसल्याने झाडे तोडण्याचे प्रस्ताव लगबगीने मंजूर केले जात आहेत.
शिवसेनेच्या रण’रागिणी’च्या पतीची डान्सबारमधील अय्याशी सोशल मीडियात ‘व्हायरल’झाल्यानंतर ठाण्यातील बार संस्कृती चव्हाट्यावर आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे मनपाने उपवन परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘सूर संगीत’ नामक लेडीज बारवर कारवाई करून बार सील केला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाणे महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प १० फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात सादर झाल्याने सादरीकरणात गोंधळ उडाला असून यावर काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाणे जिल्हा मनसेप्रमुख अविनाश जाधव यांनी याविषयी बोलताना, सत्ताधारी व प्रशासनाने खड्डे प्रकरणी अभियंत्याच्या निलंबन कारवाईत घुमजाव केले. तर यापुर्वी २०१२ आणि २०१७ च्या प्रत्येक पालिका निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यांची पूर्तता न करून ठाणेकरांच्या हाती 'नारळ' दिल्याचे म्हंटले गेले
गृहसंकुलांसह आस्थापनांमध्ये लसीकरण केंद्र ; ठाणे पालिकेचे नवे धोरण
कोविड १९ चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून आता गुरुवारपासून ठाणे स्थानकाबाहेर रात्रभर अँन्टीजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही चाचणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच रात्री ८३२ प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्यात आली.