प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवानिमित्त रेशीमबागेतून स्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालकांनी विविध विषयांवर भाष्य करीत, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन आणि दिशादिग्दर्शन केले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, देशविरोधी पसरविले जाणारे नॅरेटिव्ह आणि संस्कार-मूल्यांच्या हानीसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवरही सरसंघचालकांनी मौलिक विचार मांडले. सरसंघचालकांच्या विचारगर्भ उद्बोधनाचा हा सारांश..
Read More
विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लालबाग नगराच्यावतीने विजयादशमी पथ संचलनचे आयोजन करण्यात आले होते. अश्वारूढ असलेल्या स्वयंसेवकाने प्रतिनिधित्व केलेल्या संचलनाचे विभागातील नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. सुभाष मैदान चिंचपोकळी येथून घोष वाद्यासह सुरू झालेल्या संचलनाचा काळाचौकी मार्गे गणेश गल्ली लालबाग येथे समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्ह्याच्या वतीने विजयादशमी निमित्त कल्याण, डोंबिवली व टिटवाळा या भागात संपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांची घोषाच्या तालावर एकूण १३ संचलने काढण्यात आली. त्यात काही हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी संरक्षण उत्पादनांचा आयातदार असणारा भारत आज मोठा निर्यातक बनला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करताना केले.
“सामाजिक एकतेसाठी राजकीय विचारांतून वेगळे होऊन संपूर्ण समाजाचा विचार करून चालण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम परस्परांविषयी असलेला अविश्वास अथवा राजकीय वर्चस्वाच्या डावपेचांपासून दूर जावे लागेल. कारण देशात चालणाऱ्या स्पर्धात्मक राजकारणातून दोन गटांत फूट पाडणे ही दुर्भाग्याने रीती बनली आहे.
राष्ट्रीय विविधतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे !
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. मग यामध्ये आपली कलाकारमंडळी सुद्धा मागे नाहीत. बॉलिवूड, मराठी चित्रपट सृष्टी, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून विजयादशमीनिमित्त ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आज विजयादशमी. या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण, या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व फार कमीजणांना ठाऊक आहे. तेव्हा, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया.
स्त्री-पुरुष समानतेचे धडे अनेकदा दिले जातात. आज स्त्री ही अनेक क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. स्त्रियांनी केलेल्या उत्तम कामगिरीनंतर त्या आज पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असून स्त्री कर्तृत्वाचे दाखले नेहमी दिले जातात. नारी ही स्वतःचा विकास साधतेच किंबहुना आपल्यासोबत इतरांचाही विकास घडवते. भांडुपमध्ये अशाच प्रकारे स्वतःसोबत अनेक महिलांना स्व-रोजगार मिळवून देणार्या ज्योती राजभोज यांच्याविषयी...
असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच दसर्याचे पर्व. प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करत आयुष्याची लढाई जिंकणे हीच खरी जीवनाची विजयादशमी. आपल्या आयुष्यात विविध संघर्षांवर मात करत विजयादशमीचा उत्सव खर्या अर्थाने साजरा करणार्या नवदुर्गांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे दसरा पर्वानिमित्ताने अभिवादन. राजस्थानातील समाजपरिवर्तन दुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्या पायल जांगिड हिच्या कार्याविषयी...
असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच दसर्याचे पर्व. प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करत आयुष्याची लढाई जिंकणे हीच खरी जीवनाची विजयादशमी. आपल्या आयुष्यात विविध संघर्षांवर मात करत विजयादशमीचा उत्सव खर्या अर्थाने साजरा करणार्या नवदुर्गांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे दसरा पर्वानिमित्ताने अभिवादन. मराठवाड्यातील समाजशील दुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. योगिता पाटील यांच्या कार्याविषयी...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव लोहाणा सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा सचिव रवींद्र पाटील बोलत होते.
रा. स्व. संघाच्या परंपरेप्रमाणे यंदाही नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरुन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले
संचलनासाठी ८०० सेविका उपस्थित होत्या तर संपूर्ण गणवेशात ६२५ सेविकांनी संचलन केले.