कुठल्याही मंत्र्याने लोकांसमोर बोलत असताना तारतम्य ठेवूनच वागले बोलले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवार, २४ जुलै रोजी दिली.
Read More
मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट 'सैयारा'ने पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. या चित्रपटाच्या कथेने सर्वांना रडवले. 'सैयारा' हा भारतातील बहुभाषिक चित्रपट नसूनही या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसात १३२ कोटी रुपयांची कमाई केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होत विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे वितरित केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी युवकांना शुभेच्छा देत देशसेवेच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
प्रेक्षकांच्या विशेष प्रेमास पात्र ठरलेली ‘पंचायत’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २४ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या चौथ्या सीझनने संपूर्ण मालिकेतील सर्व विक्रम मोडीत काढत सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. या अभूतपूर्व यशानंतर प्राइम व्हिडीओने पंचायत सीझन ५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील सीझन २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.
इस्रायलने इराणची सरकारी दूरदर्शन वाहिनी हॅक केली आणि त्या वाहिनीवर व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये महिलांनी केस मोकळे सोडले होते. काही महिला रस्त्यावरच स्वतःचे केस कापत होत्या. इराणमध्ये इस्रायलने शस्त्र, अस्त्र हल्ले करून जितकी हानी केली, त्यापेक्षा जास्त हानी आणि अपमान एका व्हिडिओमुळे इराणचा झाला. कारण, याच इराणमध्ये महिलांच्या डोक्यावरचा एक केस दिसला, म्हणून महिलांच्या हत्या झालेल्या आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात शेकडो लोक फासावर गेले. हजारो लोक तुरुंगात खितपत पडले. त्यामुळेच कट्टरपंथी इरा
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा ही सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान तिच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, ज्योतीने लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडीओ आणि डेटा जप्त करण्यात यश आले असून यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
Multi-modal AI ‘एआय’ जसे जुने होत आहे, तसेच ते अधिक प्रगल्भदेखील होत आहे. आता मानवाच्या दैनंदिन गरजांवर ते कौशल्याने काम करत आहे. मात्र, एकीकडे हा प्रगतीचा टप्पा जरी ‘एआय’ने ग़ाठला असला, तरी त्याच्या नैैतिकतेवर आणि मानवाला भेडसावणार्या संभाव्य धोक्यांवर चर्चा सुरू झाली आहे. तरीही सध्या जग हे ‘एआय’च्या या विविध क्षेत्रांतील उपयोजितेचा आनंद उपभोगत आहे. ‘एआय’चा मानवी आयुष्यातील दैनिक गरजांमध्ये होणार्या उपयोगाचा घेतलेला हा आढावा...
अभिनेता राजपाल यादव यांनी आजवर विविध हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया ३ चित्रपटात तो झळकला होता. चित्रपटामुळे तर राजपाल यादव चर्चेत आहेच पण दिवाळीबद्दल एक व्हिडिओ करत हिंदु समाजाच्या भावना दुखावल्यामुळे राजपाल यादवची विशेष चर्चा सुरु आहे. याच विषयाबद्दल राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्रकाराचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पत्रकाराने राजपाल यादव यांना एक प्रश्न विचारला, ज्यानंतर त्याचा रागाचा प
Tirupati Balaji Prasad आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी या प्रसिद्ध असलेल्या देवस्थनात काही दिवसांआधी प्राण्यांच्या चरबीयुक्त तेलाचा वापर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती निर्माण झाली आहे. तिरूपती मंदिरात काही भक्तांनी प्रसादात किडे आढळल्याचा आरोप केला आहे. बुधवारी दुपारी काही भक्त दर्शनासाठी आले असता त्यांच्या प्रसादात किडे आढळल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अॅनिमल चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अॅनिमल चित्रपटात छोटेखानी भूमिका जरी केली असली तरी तृप्तीला अनेक नव्या हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' या चित्रपटात ती झळकली होती. आता सध्या तृप्ती राजकुमार राव सोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या आगामी चित्रपटात काम करणार आहे. सध्या हा चित्रपट, त्यातील गाणी आणि तृप्ती एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या राजकुमाक राव आणि तृप्ती डिमरी प्रमोशनमध्ये व्यस्
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
Hindu-Muslim Love Relationship कट्टरपंथी युवतीचे उत्तर प्रदेशातील एका हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध आहे. याप्रकरणी आता कट्टरपंथी तरूणीच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीचे आणि हिंदू मुलाचे प्रेमसंबंध पसंत नाही. तिच्या घरच्यांनी तिच्या प्रेमाला तीव्र विरोध केला आहे. तिला तिच्या कुटुंबीयांनी घरात कोंडून ठेवले असून तिचा खून केला जाईल असा संशय असल्याची भिती तिला आहे. याआधी पीडितेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहे. याप्रकरणाची माहिती पी़डि
प्रेक्षकांचा कल चित्रपटांपेक्षा अधिक वेब सीरीजकडे जास्त दिसून येत आहे. ओटीटी माध्यमांवर एकाहून एक दर्जेदार कलाकृती येत असून या यादीत पंचायत ही वेब सीरीज विशेष गाजली. या वेब सीरीजचे तीनही भाग प्रेक्षकांना विशेष आवडले. ‘पंचायत ३’ या वेब सीरीजमध्ये कोणताही मोठा स्टार किंवा लोकप्रिय कलाकार नसूनही या वेबसीरिजने २०२४ मधील most watched Indian show च्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
ओटिटी विश्वातील मोठी बातमी पुढे येत आहे. व्हिडिओ ओटिटी सर्विसेस देणारी सुप्रसिद्ध कंपनी अमेझॉनने एमएक्स प्लेअर (MX Player) चे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. भारतात व्यवसायिक सेवा वाढवण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय अमेझॉनकडून घेण्यात आला आहे.
लोकप्रिय वेब सीरीज पंचायत या सीरीजचे दोन्ही भाग प्रेक्षकांचा फार आवडले. यानंतर तिसरा भाग कधी येणार याची वाट पाहात असताना आज (२८ मे २०२४) पासून Amazon Prime Video वर पंचायत सीझन ३ प्रदर्शित झाला आहे. परंतु, प्रदर्शित होताच संपुर्ण सीझन Leaked झाल्याची घटना समोर आली असून मेकर्सना मोठा धक्का बसला आहे.
पंजाबचे स्थानिक प्रशासन आणि संसदीय कामकाज मंत्री बलकार सिंह वादात सापडले आहेत. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते व्हिडिओ कॉलवर एका महिलेसोबत लैंगिक कृत्य करताना दिसत आहे. मात्र, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. जालंधरचे माजी उपायुक्त असलेले बलकार सिंह यांनी २०२१ मध्ये AAP (आम आदमी पार्टी) च्या तिकिटावर करतारपूरमधून आमदार झाले होते. आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW)ही या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिच्यावर ६ महिने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रिजवान असे मुख्य आरोपीचे नाव आहे. रिझवानने अल्पवयीन मुलीला त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच पीडितेला घरातील कामे करायला लावली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. शनिवार, दि. २५ मे २०२४ दिलेल्या या तक्रारीत आरोपी मुमताजची आई आणि आणखी एका तरुणाचीही नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थींनीला इस्लाम धर्म स्वीकारून लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. फैजल आणि अमीन अशी धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पीडितेला तिच्या व्हॉट्सॲप नंबरवर अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आल्या होत्या. यासोबतच एआय टूलच्या मदतीने विद्यार्थींनीचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवार, दि. २० मे २०२४ एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
केरळमधील कोल्लममध्ये आशिक बद्रुद्दीन नावाच्या स्थानिक काँग्रेस युवा नेत्याला बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून महिलांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांनी काँग्रेसचा युवा नेता आशिक बद्रुद्दीन यांच्याविरोधात थिनमला येथे शौचालय ऑपरेटर म्हणून काम करत असताना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
निवडणुकीच्या धामधुमीत खोटे व्हिडिओ खोटे फोटो वायरल होण्याची शक्यता असते. अशातच काही प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आल्याने ओपन ए आय (Open AI) कंपनीने युएस स्थित कंटेंट प्रोव्हिंस अँड ऑथेन्टिसिटी कमिटीशी हातमिळवणी केली आहे. आगामी काळातील 'डिपफेक' व्हिडिओ रोखण्यासाठी कंपनीने ही नवी खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. ओपन ए आय ही चाट जीपीटी बनवणारी मातृसंस्था आहे. याशिवाय भारतातही मोठे पाऊल उचलत कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी देखील केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक मीम व्हिडिओ शेअर केला एक 'एक्स' वापरकर्त्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी एक्सवरच धमकावले आहे. सोमवार, दि. ६ मे २०२४ रोजी कोलकाता पोलिसांच्या डीसीपी गुन्हे शाखेच्या अधिकृत खात्याने एका वापरकर्त्याला त्याची ओळख उघड करण्यास सांगितले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता सांगण्यास सांगितले.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा एक डीपफेक व्हीडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अनेकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमधून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष अजेंचा घेऊन अमित शहांचे डिपफेक विडीयो वायरल केले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मिका मंदाना, काजोल, कटरिना कैफ, आमिर खान यांच्यापाठोपाठ रणवीर सिंग (Ranvir Singh Deepfake Video) देखील डीपफेकचा बळी ठरला होता. या व्हिडिओत त्याने कॉंग्रेसचा प्रचार केल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु, हे सर्व खोटं असून यासंदर्भात रणवीरने (Ranvir Singh Deepfake Video) थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे.
यंदा मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना नालेसफाई सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि ते संपल्यानंतर, अशा तीन टप्प्यांमध्ये चित्रफित व छायाचित्रे काढून ती आपल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. त्यात प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) याचा समावेश असणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा गैरवापर थांबण्याऐवजी वाढतच आहेत.काही दिवसांपूर्वी एनएसई (NSE) चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांच्या नावाने डीपफेक व्हिडिओ वायरल झाले होते तोच प्रकार पुन्हा घडत सोशल मीडियावर बीएसईचे मुख्य कार्यकारी संचालक सुंदररमन राममूर्ती यांचे खोटे डिपफेक व्हिडिओ वायरल झाले आहेत..
नुकतेच अमेझॉन कंपनीचे ओटीटी प्लॅटफॉर्म ( अमेझॉन प्राईम व्हिडिओ) अडचणीत सापडला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हातचलाखीचा आरोप करत एफटीसी या संस्थेने कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. प्राईम व्हिडिओवर ग्राहकांना पूर्वीच वार्षिक वर्गणी भरूनदेखील ' जाहिरात सपोर्टेड प्लॅन' दाखवून विना जाहिरात नवीन प्लॅनसाठी अधिक पैसे भरण्याची मागणी केल्याचा आरोप अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईमने आपले धोरण बदलत' अँड सपोर्टेड' योजना घोषित केली होती.
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील प्रमूख आरोपीला अखेर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डीपफेक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबर २०२३ रोजी एफआयआर नोंदवला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. याच आरोपीने रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर येत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाला आहे. सचिनने यासंदर्भात "X"वर पोस्ट करत डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी ठोस भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे.
एका मुस्लिम महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती तिच्या सह-धर्मियांना गैर-मुस्लिमांनी स्पर्श केल्यानंतर त्यांचे शरीर स्वच्छ आणि शुद्ध करण्यास सांगताना दिसत होती. मेहंदी आणि मेकअप लावण्यासाठी बिगर मुस्लिमांना कामावर घेण्याच्या संदर्भात तिने हे भाष्य केले. "तुम्ही बिगर मुस्लिमांना मेहंदी आणि मेकअप लावण्यासाठी कामावर ठेवू शकता?" असा बुरखा घातलेल्या महिलेने प्रश्न मांडला.
‘डीप फेक’ तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविषयी केंद्र सरकार सर्व समाजमाध्यमांशी चर्चा करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.
अभिनेते नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाराणसीत सध्या ते एका चित्रपटाचे चित्रिकरण करत असून यावेळी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅनला नाना पाटेकरांनी रागात डोक्यात टपली मारली होती. घडलेल्या या घटनेनंतर नानांना नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतु, लोकांचा राग लक्षात घेता नानांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकरणाचे स्पष्टीकरण देत माफी देखील मागितली होती. मात्र, आता नानांनी ज्या मुलाला मारलं त्या मुलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून यात नानांनी मागितलेल्य
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बळी आणखी एक अभिनेत्री ठरली आहे. ही अभिनेत्री आहे काजोल. काजोलचा चेहरा लावून कपडे बदलण्याची ही व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डिपफेक व्हिडिओ काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. यावर आता दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. रश्मिका मंदानाच्या या डीपफेक व्हिडिओविरोधात दिल्ली पोलिसांनी शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंधानाच्या ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे हे तंत्रज्ञान चर्चेत आले. अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं कोणाचीही प्रतिमा मलीन करू शकतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आपल्याला माहिती असणे, आवश्यक झाले आहे.
समाज माध्यमावर सध्या सामान्य लोकांपासून ते कलाकारांचे मॉर्फ फोटो, व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण वाढत चालले आहे. नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावरुन अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही या फेक व्हिडिओबाबत चिंता व्यक्त करत थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावर विविध स्तरांतून संताप व्यक्त केल्यानंतर आता स्वत: रश्मिकाने याबद्दल मौन सोडले आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावर कलाकारांनी तर नाराजी व्यक्त केली आहेच, पण स्वत: रश्मिकाने देखील यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह व्हिडीओवर मोदी सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डीपफेक व्हिडीओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, “मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरीकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
लखीमपूर खेरी येथील संपूर्णानगरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. वास्तविक, हे प्रकरण लव्ह जिहादचे असून, मृत पीडितेच्या आईने धर्मांतर आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली अन्य विशिष्ट समुदायातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मोठ्या संख्येने गावकऱ्यांसह कुटुंबीयांनी रस्त्यावर घोषणाबाजी सुरू केली, गावकऱ्यांसह बजरंग दलाचे तरुणही घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.
मिखील मुसळे दिग्दर्शित ‘साजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची फौज काम करताना दिसणार आहे. यात अभिनेता सुबोध भावे वेगळ्या पठडीची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका शिक्षिकेच्या अर्थात सजनी शिंदेच्या जीवनात एक प्रसंग घडतो आणि ती गायब होते, त्यानंतर चित्रपटात अनेक रहस्यमय घटना घडतात असे या चित्रपटाचे कथानक आहे. शिक्षकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, “सामान्य माणसांप्रमाणेच प्रत्ये
पुण्यातल्या एका आयटी कंपनीत नोकरी ते अभिनयाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे हा शाळेत अतिशय मस्तीखोर मुलगा होता याची कबूली त्याने स्वत:च दिली आहे. 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना सुबोध म्हणाला की, “आत्ता तुम्हाला दिसणारा मी आणि शाळेतला मी या दोन्ही वेगळ्या व्यक्ती होत्या. कारण शाळेत मी प्रचंड मस्तीखोर होतो आणि त्याचमुळे शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचा मी मार खाल्ला आहे”. 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली', '
पूरपरिस्थितीची पहाणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या ताफ्यापुढे आलेल्या व्यक्तीचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्या व्हीडिओची तोडमोड करुन अनेकांनी फडणवीसांनी नागरिकाला ओढत नेले, असा आरोप करण्यात आले. मात्र, या व्हीडिओमागील सत्य आता पुढे आले आहे. संबंधित व्यक्तीने स्वत:हून समोर येत या विषयातील वस्तूस्थिती आज जनतेसमोर कथन केली.
गेली काही वर्ष लोकांना भुरळ घातलेल्या युट्यूबला १५ वर्ष पुर्ण झाली आहेत. २००८ मध्ये युट्यूब भारतात सुरू झाले होते. आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येकाचा मनात युट्यूब एक स्थान निर्माण केले आहे. व्हिडिओ अपलोडिंग कंटेंट लायब्ररी या संकल्पनेतून युट्यूब अल्पावधीतच मोठे यश मिळाले. सामान्य माणसापासून लहान थोरांपर्यंत पोहोचलेल्या युट्यूबची उपयुक्तता ही समाजाला लाभदायक ठरली आहे.
केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करू नये , असे फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी एका प्रपोजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून वाद वाढल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. आता मात्र मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास पुर्णपणे बंदी आहे.
आजकाल प्रँक व्हिडिओ बनवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. काही लोकांना प्रँकचा खूप राग येतो आणि ते नाराजही होतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका घटनेत, एका अमेरिकन यूट्यूबरला प्रँक केल्यामुळे गोळ्या घातल्या आहेत. 1999 साली MTV वर "MTV Bakra" नावाचा रिअॅलिटी शो प्रसारित झाला तेव्हा भारतात प्रँक व्हिडिओंचा ट्रेंड सर्वाधिक प्रचलित होता, जो सायरसने होस्ट केला होता.
‘आयसीआयसीआय’ बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर कर्ज फसवणूक प्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या ‘सीबीआय’ने कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि ‘व्हिडिओकॉन’चे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अन्य सहा जणांची नावे आहेत.
शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. "तो व्हिडीओ मॉर्फ आहे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आधी ओरिजिनल व्हिडीओ दाखवा. तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी स्पष्ट होऊ द्या," असं राऊत म्हणाले.
Sheetal Mhatre यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात!
चंदिगढमधील ‘एमएमएस’ प्रकरणावरुन अपेक्षेप्रमाणे पंजाबमध्ये वादंग उठला. विद्यापीठाच्या वसतिगृहातीलच एका विद्यार्थिनीने तिच्या सोबतच्या इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे चक्क नकळत व्हिडिओ काढले आणि ते हिमाचल प्रदेशातील काही मुलांबरोबर निर्लज्जपणे शेअरही केले. आता यामागे नेमकी काय कारणं होती, ते तपासाअंती स्पष्ट होईलच. खरंतर एका विद्यार्थिनीनेच आपल्या सोबत राहणार्या विद्यार्थिनींची अशी बदनामी करणे हे सर्वस्वी धक्कादायकच म्हणावे लागेल. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून हिमाचल प्रदेशातून पंजाब पोलिसांनी संबं
ईशान्य बौद्धिक मंच (IFNE) आणि आसाम पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, गुवाहाटी येथे Lokmanthan २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१, २२, २३ आणि २४ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. लोकमंथनाचे हे तिसरे पुष्प असून 'लोक परंपरा' ही यंदाची थीम आहे. यावेळी लोकपरंपरेतील आपले सांस्कृतिक भान जपण्यात आणि राष्ट्रवादाची भावना दृढ करण्यात त्याचा कसा वाटा आहे, यासंबंधित प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच चर्चा, परिसंवाद, सांस्क