गेल्या सहा वर्षांपासून गोरेगावमधील पालिकेच्या टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मात्र आता या कामासाठी पुन्हा निविदा मागविल्या असून त्यामध्ये या प्रकल्पाचा खर्च ३० कोटींनी वाढविण्यात आला आहे. आता १३० कोटींचा अपेक्षित खर्च १६० कोटींवर गेला आहे. तळमजल्यासह १६ मजल्याची ही इमारत असणार आहे.इमारत परिसरात सीसीटीव्ही,योगा केंद्र,शॉपिंग सेंटर,सभागृह आणि व्यायामशाळा असणार आहे.
Read More