वैदिक विवाह संस्कारात सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा विधी जर कोणता असेल, तर तो म्हणजे सप्तपदी होय. या संदर्भात अशी मान्यता आहे की, हा विधी जर पार पडला नाही, तर तो विवाहच पूर्ण होत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने का असेना? पण हा विधी सर्वत्र संपन्न केला जातोच. सप्तपदीशिवाय विवाह नाही अन् विवाहाविना सप्तपदी नाही. यासाठी तर सप्तपदी का? कशासाठी? वगैरे गोष्टींचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते.
Read More