व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
Read More
'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.