केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, बिहार वगळता इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरावलोकनासाठी (एसआयआर) प्राथमिक पावले उचलण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. या राष्ट्रव्यापी एसआयआर साठी १ जून २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Read More
काँग्रेस सध्या दुहेरी भूमिका घेत आहे. एकीकडे ती ‘महागठबंधना’चा भाग राहून तेजस्वी यादवांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा बघते, तर दुसरीकडे ती स्वतःला पर्याय म्हणून जिवंत ठेवायचा प्रयत्न करते. बिहारच्या राजकारणात ही भूमिका फार धोयाची आहे. कारण, मतदारांना अस्पष्ट नेतृत्व मान्य नसते. रालोआकडे नरेंद्र मोदींचे करिश्मा आणि नितीशकुमारांची प्रतिमा आहे. त्यातुलनेत ‘महागठबंधना’तील अनिश्चितता मतदारांना अस्वस्थ करू शकते.
बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीवर आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाकडून एकही दावा किंवा हरकत दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्याचवेळी मतदारांकडून थेट ३,६५९ दावे आणि हरकती दाखल झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे केवळ प्रशासकीय उपाययोजना नसून, लोकशाहीच्या शुचितेची ती निर्णायक लढाईच होय.
आधार आणि रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून समाविष्ट करण्याचा विचार करावा – न्यायालयाचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
(Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजप महायुतीचे आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांचा ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शनिवारी शासकीय विश्रामगृहात हा सत्कार सोहळा पार पडला.
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नऊपैकी सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) पुन्हा तळपले असून मतदारांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
लांगूलचालन करून सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणार्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेस-शरद पवार आणि उबाठा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला असून, ६०च्या आतच त्यांचा डाव आटोपला आहे. भाजपने ‘न भूतो’ अशी विक्रमी कामगिरी करीत भल्याभल्यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या ( BJP ) या महाविजयाची पाच कारणे...
लोकसभा निवडणुकीत पृष्ठभागाखाली असलेला धार्मिक मतदानाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आता उघडपणे समोर आला आहे. काही मुस्लीम संघटनांची मजल मतांच्या बदल्यात बेकायदा आणि अवाजवी मागण्या करण्यापर्यंतही गेली. एकप्रकारे राज्यातील हिंदू मतदारांना हे आव्हान दिले गेले. गंमत म्हणजे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणार्या पक्षांनीच या उघड जातीयवादी व घटनाविरोधी आवाहनाला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाला वाचविण्यासाठी हिंदू मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची गरज आहे. मतदान करणे हे क
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ही विकासाच्या मुद्द्यांबरोबरच ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी प्रकर्षाने दिसून आली. त्यानिमित्ताने अलीकडच्या काळात देशभरात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता, हिंदूंची सामाजिक-राजकीय परिघातील एकता, हिंदूंचे हिंदुत्ववादी पक्षांना उत्स्फूर्त मतदान का आवश्यक आहे, त्याची प्रचिती यावी. अशाच हिंदू एकतेचा गजर अधोरेखित करणार्या वर्तमानातील घटनांचे हे प्रतिबिंब...
विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांशी संपर्क साधण्याचा योग आला. चंद्रपूर, नागपूर, अमरावती अशा तीन जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतील नागरिकांना भेटले. खोटे ‘नॅरेटिव्ह’, फुटीरतावादी परिस्थिती तयार करणे आणि लोकांना भ्रमित करणे, असे उद्योग तिथेही राजरोसपणे सुरु आहेत. त्यातही काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्या मतदारसंघांमध्ये तर काय विचारता सोय नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भातील हिंदूंचे मत काय, याचा मागोवा ...
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान ( Voters ) झाले आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढाईत या खेपेला मनसेही रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. ठाणे ( Thane ) महापालिका क्षेत्रात येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी - पाचपाखाडी, ओवळा - माजिवडा आणि मुंब्रा कळवा या चार विधानसभा क्षेत्रात बुधवारी (ता.२० नोव्हे.) मतदानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साह
मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार ( Voters ) जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
( Congress ) काँग्रेसला मतदान करण्याकरिता जारी करण्यात आलेल्या एका कथित फतव्याची प्रत काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमाने चव्हाट्यावर आणली होती. दुबई अमिराती मधील मुस्लीम संघटना आणि असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम संघटनेंकडून हा फतवा जारी करण्यात आला होता.
जोपर्यंत भारतात हिंदू समाजाची बहुसंख्या आहे, (‘हिंदू’ यात वैदिक, बौद्ध, जैन, शीख, सनातनी, आर्य समाजी असे सर्व पंथोपंथ येतात) तोपर्यंत लोकशाहीला काहीही धोका नाही आणि जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आहे, तोपर्यंत संविधानालाही काहीही धोका नाही. धोक्याची आरोळी जे ठोकतात, तेच देशाला फार धोकादायक आहेत.
अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या, दि. ५ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यावेळी प्रत्येक मतदाराचे मत दोघांसाठीही आवश्यक ठरणार आहे. अमेरिकेत भारतीय मतदारही बहुसंख्य आहेत. अमेरिकेतील भारतीय मतदारांच्या सामर्थ्याचा घेतलेला हा आढावा...
मुंबई- Election commission news : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून बुधवार, दि. ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंचा त्यात समावेश असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळातील देशभरातील प्रचाराचा धुरळा आणि त्यानंतरचे कवित्व यावर सर्वदूर मंथन होत आहे. आधी दैनिकांमधून ते होत होते, मग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आली, आता तर सोशल मीडियावर देखील याची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करीत आहे.
उत्तर मध्य मुंबई हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु, २०१४ पासून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळेस वर्षा गायकवाड यांना मैदानात आणून काँग्रेसने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; पण अंतर्गत गटबाजी आणि 'देशद्रोही' विधानांमुळे आपसूकच आव्हान संपुष्टात आले.
१८व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरलेला दिसला. विशेषकरुन शहरी भागांमध्ये मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवली. त्यानिमित्ताने शहरी मतदारांची उदासीनता, त्यामागील कारणे, उपाययोजना यांचा आढावा घेणारा आणि विशेष म्हणजे एका तरुणीने लिहिलेला हा लेख...
लोकसभेचा रणसंग्राम तापू लागला आहे. युती-आघाडीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत. या निवडणुकीत राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत.
पुण्यातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांनी गेल्या काही काळात अधिक समावेशक धोरण सर्व पातळ्यांवर स्वीकारल्याचे दिसते. पुण्यातल्या शिक्षणसंस्था शतकाहून अधिक काळ आपले नाव आणि आदर देशाच्या शैक्षणिक वर्तुळात राखून आहेत. त्यामुळे इथे असे काही घडणे अपेक्षितच. अलीकडच्या काळात राष्ट्रीय पातळीवरूनच, अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी व्यावसायिक-औद्योगिक सहकार्याचा हात हाती घेण्यासाठी, उच्चशिक्षण संस्थांना प्रोत्साहित केले जात आहे. समाजातल्या सर्व घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रचारप्रसार करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्य
प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणांनी देशाच्या विकासासाठी मतदान करावे. देश आज २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयावर काम करत आहे. त्यामुळे तुमचे मत देशाची दिशा ठरविणारे असेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित नवमतदार संवाद कार्यक्रमात गुरूवारी केले.
महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिशनर आणि महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी सदर निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासह संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे.
राजकीय पक्षांनी निवडणुका लढताना अजिबात गाफील राहता कामा नये, असे सांगताना आपला पक्ष सावध असल्याची सूचक प्रतिक्रिया पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली आणि पक्षात गुणवत्तेनुसारच निवड प्रक्रिया होत राहील, असा गर्भित इशारादेखील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणार्यांना देत त्यांनी नेम साधला. सध्या पुण्यात कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा ज्वर शिगेला आहे. या निवडणुका घोषित होताच, या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी आपापल्यापरीने रणनीती आ
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर आता निवडणुकीचा आणखी एक टप्पा पुढे सरकला आहे.
पालिकेच्या रुग्णालयात शिस्त पाळली जावी यासाठी सातत्याने प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही अनेकदा लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळी रुग्णालयाच्या दैनंदिन कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे आता वैतागलेल्या डॉक्टरांनी आता लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो अॅपद्वारे देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे, मी देशातील सर्व मतदारांचे अभिनंदन करतो. ते म्हणाले की, मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, मतदानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन ७५ टक्के मतदान व्हावे.
'राष्ट्रीय मतदार दिवसा'च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अॅप' वर करणने एक पोस्ट लिहिली आहे.
केरळमध्ये माकपची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे. काँग्रेस २०१६ सालच्या पराभवाचे उट्टे काढण्यास आतुर आहे. १९८० सालापासून केरळीय मतदार दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणतो. त्यानुसार आता संयुक्त आघाडी सत्तेत येऊ शकते.
आसाममध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मतदारांवर प्रतिकूल परिणाम झाला. म्हणूनच सोनोवाल वनवासी समाजातील असूनही मतदारांनी याकडे लक्ष दिले नाही. हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा ठरतो. कारण, आसामच्या इतिहासात एक वनवासी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.२०२१ हे वर्षं अजूनही जरी कोरोनाच्या छायेखाली असले आणि कोरोनाची लाट पूर्णपणे नाहिशी झालेली नसली, तरी राजकीय क्षेत्रातल्या स्पर्धेला आणि हाणामारीला मात्र ऊत आलेला दिसतो. या वर्षी एप्रिल/मे महिन्यात तब्बल पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणु
शिवसेनेला गुजराती मतदारांसाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता का भासली? गुजराती मतदारांनी शिवसेनेला साथ दिली नाही तर शिवसेनेच्या हातातून मुंबई महानगरपालिका जाईल का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघांसाठी आज मतदान
१.४६ कोटी मतदार बजाविणार मताधिकार
मतदाराला ‘काँग्रेस पक्ष नको’ याचा अर्थ निवडणूक चिन्ह नवे वा नेत्याचा चेहराच नवा हवाय असे नाही. ज्यांची कार्यशैली व वर्तणूक वेगळी व जनताभिमुख असलेले नेतृत्व जनता शोधत असते. ते ज्या पक्षाकडे असेल, त्यालाच मतदार प्रतिसाद देत असतो.
‘ब्रेक्झिट’च्या ‘ब्रेकअप’ मालिकेत ब्रिटनला पाच वर्षांत तिसर्या निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे. नवे सरकार कोणाचे असणार, यासाठीचे मतदानही झाले. ब्रिटनसारख्या लोकशाहीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाची परिणती तीन निवडणुकांमध्ये झाली.
गुमला जिल्ह्यातील बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे.
राज्यात ६२ हजार ३६६ अंध मतदारांची २३ हजार १०१ मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ३ लाख ९६ हजार ६७३ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनयंत्रणा सज्ज
मतदान हा केवळ अधिकारच नव्हे, तर ती जबाबदारीही आहे. जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य, वर्तणूक, क्षमता लक्षात घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे.
देशात सतराव्या लोकसभेसाठी मतदान झाले आणि बहुमताने भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचे आभार मानताना मतदार महिलांचा विशेष उल्लेख केला
दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
राज्यात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्र असणार आहेत. राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली असल्याने यंदा मतदार केंद्राची संख्या वाढली.
या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. २४ तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे.