राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी आणि आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
Read More
ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालय घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय आता दूर झाली आहे. वांद्रे येथील म्हाडा भवनात सुसज्ज असे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे.
‘प्रधानमंत्री गतिशक्ती’ आणि आधारकार्ड या दोहोंच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व विकासकार्यांना एक युनिक आयडेंटिटी नंबर देऊन, त्या त्या प्रकल्पांशी निगडित सर्व तपशील एका समान पोर्टलवर प्रसारित करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. या निर्णयाकडे नगर विकास क्षेत्रात सुशासन आणणारे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
मुंबई : “राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन, त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे,” अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी दिल्या.
रेल्वे जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.
नवी दिल्लीतील जामा मशिदीसह दिल्ली वक्फ मंडळाच्या ताब्यात असलेल्या १२३ वक्फ संपत्ती या सरकारजमा होणार आहेत. केंद्रीय शहरविकास मंत्रालयाने तशी नोटीस दिल्ली वक्फ मंडळास पाठविली आहे.
मुंबईत १६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले. सात लाखांहून अधिक रुग्णांना याचा लाभ घेतला. ३१ मार्च पर्यंत एकूण २०० दवाखाने मुंबईत तयार होतील. तसेच राज्यभरात एकूण पाचशे ठिकाणी दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित अभियान सुरू करण्यात आले. तसेच राज्यात ४ कोटी ५० लाख माताभगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जागरुक पालक अभियानातून सुरुवात झा
महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्चित. शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली असून त्यात प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
‘दिव्याला अतिरिक्त पाणी मिळणार!’ अशा गमजा सत्ताधारी शिवसेनेमार्फत मारण्यास सुरुवात झाली असून, सोमवारीही दिव्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी या भागाला मंगळवारपासून सहा ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांकडे नगरविकास खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी
पुण्यातील कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे
नगरविकास विभागाची स्थानिक संस्थांना ताकीद