Union Territory of Bharatiya Janata Party

‘जमीनच्या बदल्यात नोकरी’ या प्रकरणातील खटल्याला स्थगिती नाकारली; सुप्रीम कोर्टाचा लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संस्थापक लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या ‘जमीनच्या बदल्यात नोकरी’ या घोटाळ्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवार, दि.१८ जुलै रोजी स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर, त्या निर्णयाविरोधात यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Read More

१६ वर्षे विभक्त राहिलेल्या दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयात घटस्फोट मंजूर!

एका विभक्त दाम्पत्याला विवाहाच्या ‘अपूरणीय विघटन’ (Irretrievable breakdown of marriage) तत्व म्हणजे पती-पत्नीमधील संबंध इतके ताणले जातात की, ते पुन्हा एकत्र येणे शक्य नसते. या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “हा वैवाहिक संबध कायम ठेवण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. यामुळे पक्षांमध्ये केवळ वैर आणि मानसिक त्रास सुरू होईल, जे कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक सुसंवादाच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध

Read More

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्य

Read More

‘पिस्को' जीआय टॅगच्या वादाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रेडमार्क आणि जीआय मधील फरक केला स्पष्ट

पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा,१९९९’ मधील मुलभूत फरक स्पष्ट केला आहे. पेरू आणि चिली या दोन दक्षिण अमेरिकन देशांमधील संघटनांदरम्यान सुरू असलेल्या जीआय हक्कांवरील संघर्षावर सुनावणी करताना, जीआय आणि ट्रेडमार्क कायद्याचे स्वरूप आणि हेतू पूर्णत: भिन्न असल्याचे उच्च न्यायालयाने

Read More

नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली.

Read More

कन्हैयालाल यांच्या हत्येची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटावर बंदी आणा; मुस्लिम संघटनेची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read More

तारीख ठरली! तब्बल दोन वर्षानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

Read More

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.

Read More

"ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी..." लेखक विक्रम संपथ यांची 'ती' पोस्ट व्हायरल!

दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला

Read More

फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्रीवर पण दावा ठोका! सुलताना बेगमला सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल

फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्रीवर पण दावा ठोका! सुलताना बेगमला सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121