मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई सुरु झाली आहे. गुरुवारी पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता ठाण्यातील अनेक बार व पबवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अवैध कामांविरोधात बुलडोझर घेऊन मैदानात उतरल्याचे दिसुन येत आहे.
Read More