आजच्या जागतिक समस्यांमध्ये हवामान बदल ही सर्वांत मोठी समस्या. हे संकट केवळ पर्यावरणपुरते मर्यादित नसून मानवी जीवनमान, अन्नसुरक्षा, जलसंपदा, स्थलांतर, जैवविविधता आणि जागतिक शांतता यांवरदेखील त्याचा गंभीर परिणाम होतो. या सर्व समस्यांतून निर्माण होणार्या परिणामांच्या केंद्रस्थानी आहेत महासागर, जे पृथ्वीवरील जीवनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पृथ्वीच्या सुमारे 70 टक्के पृष्ठभागावर पसरलेले महासागर हे केवळ जलाशय नाहीत, तर पृथ्वीच्या हवामानचक्राचे महत्त्वाचे नियामकही आहेत. महासागर दरवर्षी पृथ्वीवर निर्माण होण
Read More