कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
Read More
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची महत्वाची घोषणा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांपुढे परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न सर्वांपुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे.
देशात शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला असावा त्यात कुठल्याही प्रकारचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, जाणून बुजून विशिष्ट प्रकारचा खोडसाळपणा चुकीचाच असल्याच्या प्रतिक्रीया आता १२ वी परीक्षा फॉर्ममधून हिंदू धर्माचा रकाना गायब करण्याच्या प्रकरणावर उमटू लागल्या आहेत.
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,