एकीकडे नुकतेच उत्तरकाशीतील बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका झाल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मागील काही महिन्यांत देशाच्या कानाकोपर्यात घडलेले औद्योगिक क्षेत्रातील अपघातही तितकेच चिंताजनक ठरावे. त्यानिमित्ताने या अपघातांमागची कारणे आणि सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
तब्बल १७ दिवसानंतर उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सर्व मजुर सुखरुप असून संपुर्ण देशभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांचे स्वागत केले.
नितीन गडकरी म्हणाले, “मला आनंद आहे की सिलक्यारा दुर्घटनेत जे ४१ मजुर अडकले होते ते बाहेर निघाले आहेत व सर्वजण सुखरुप आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मार्गदर्शनाखाली भारत सरकारची सर्व पथके, उत्तराखंड सरकार आणि तेथिल स्थानिक जनता यांच्या अथक परीश्रमामुळेच हे यश मिळाले आहे.
गेल्या आठवडाभरापासून उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडीओ आता समोर आले आहेत. पाईपमधून पाठवण्यात आलेल्या एंडोस्कोपिक कॅमेराद्वारे हा व्हिडीओ समोर आला असून ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व मजूर सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अद्याप बचावकार्य सुरुच आहे. यामध्ये आता लष्कर आणि हवाई दलाचे पथकही सहभागी झाले आहेत. पाईपद्वारे बचावकार्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील सिलक्यारा ते डंडालगावपर्यंत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे.
उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे.