मुंबईतील सांडपाणी वापरण्यायोग्य होणार! मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी कार्यवाही प्रगतिपथावर
Read More
मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने तयार केला रेल मुंबई टोकापासून सहावा कोच ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये वृद्ध प्रवाशांसाठी समर्पित डब्यासह पहिला इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) रेक सादर केला आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशांना त्वरित प्रतिसाद म्हणून, माटुंगा वर्कशॉपच्या डेडिकेटेड टीमने या रेक तयार केला.
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!
राज्य शासनाने होमगार्ड्सच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यामुळे आता होमगार्ड्सना देशातील सर्वाधिक मानधन मिळणार आहे.
छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाचे कुलगुरु आणि भारतीय विश्वविद्यालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या २०० कुलगुरुंनी राहुल गांधी यांना निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ”कुलगुरुंची नियुक्ती गुणवत्तेनुसार नाही, तर एका विशिष्ट संघटनेच्या इशार्यावर केली जाते असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी देशभरातील विद्यापीठांची बदनामी केली आहे.” यावर वाटते की, राहुल गांधी कुलगुरुंची, देशातल्या विद्यापीठांची अशी बदनामी का करत आहेत?
दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या हत्येस मोदी सरकार जबाबदार आहे, असा प्रचार करून आपली पोळी भाजणार्या पुरोगामी कंपूचा बुरखा अखेर फाटला आहे. रोहित वेमुला याचे जातप्रमाणपत्र बनावट होते, असे तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे मिळालेल्या पदव्या रद्द होऊ शकतात, याची त्याला भीती होती तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांचाही त्याला राग होता.
ठाणे महापालिकेचे कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यात येत असले तरी कंत्राटी कर्मचार्यांना हजेरीनुसार विलंबाने मानधन दिले जाते. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या १० तारखेपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. कंत्राटी कर्मचार्यांना त्यांचे वेतन सोमवार दि. ६ नोव्हेंबरपूर्वी देण्याचा निर्णय ठाणे पालिकेकडून घेण्यात आला आहे.
वेळ पडली तेव्हा आईचे दागिने गहाण ठेवले. काठीने सराव केला. तिने तलवारबाजी हा खेळ घरोघरी पोहोचवला. जाणून घेऊया भारताची पहिली आंतरराष्ट्रीय तलवारपटू भवानी देवीविषयी...
मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख..
स्व. मधू दंडवते यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या ‘कोकण रेल्वे’ची ‘शिट्टी’ आता थेट नेपाळमधील कुर्था येथपर्यंत पोहचली आहे. कोकण रेल्वेच्या दोन ‘डेमू’ट्रेन नेपाळ रेल्वेच्या लाईनवर धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरु झाली.
'आययूसीएन'ची माहिती
विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आबिदअली नीमचवाला हे पदावरून पायउतार झाले आहेत.
राकेश कृष्णन दिग्दर्शित लूटकेस या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. पैशांनी भरलेली एक सुटकेस आणि त्या पैशाच्या हव्यासापोटी अडकलेले अनेक लोक यांच्या कचाट्यातून सुटून अखेर सुटकेस कोण लुटून घेऊन जाते हा सगळा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलाय.
मुंबई-पुणे-नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणाची चर्चा वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राच्या नेहमीच केंद्रस्थानी असते.
निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेतच. आता पुन्हा एकदा मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित करून मतदारांच्या मनात भ्रम उत्पन्न करण्याचे उद्योग विरोधकांनी चालविले आहेत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांबद्दल शंकाकुशंका उपस्थित करून त्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचे विरोधकांनी ठरविले आहे.
उत्तर प्रदेश येथील भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याने पुन्हा एकदा वादग्रस्त वकत्व केले आहे. गरज पडली तर पुन्हा एकदा भीमा-कोरेगाव घडवू अशी मुक्ताफळे त्याने यावेळी उधळली.
जातीसमूह हे केवळ मतांचे गठ्ठे आहेत, असे मानणाऱ्या लोकांना ‘डिक्की’चे मिलिंद कांबळे काय म्हणतायत हे कधीच कळणार नाही.
रोहितच्या आईनेच घरासाठी 20 लाख रुपये देण्याच्या मुस्लीम लीगच्या दाव्यातला खोटारडेपणा जगासमोर आणत मुस्लीम लीगचा बुरखा फाडला आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम शनिवारी दिसून आला यामुळे सर्वसामान्य बाजारातील भाजीपाल्यासह कल्याण कृषी उत्पन्न समिती बाजारपेठेतील भाव दुपटीने वाढले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी रस्तोरस्ती असलेल्या खड्ड्यांसोबत फोटो काढून ही मोहीम महाराष्ट्रातील सर्व नेटकऱ्यांपर्यंत पोहचण्यास ३१ ऑक्टोबरला सुरुवात केली. फडणवीस सरकारला तीन वर्ष यशस्वी शासन केल्याबद्दल ही विरोधकांची आगळीवेगळी भेट राज्य शासनाने स्वीकारली. या फोटो भेटीवरून सर्वांत जलद तक्रारींचे निवारण फक्त भाजप सरकार करत आहे असे वातावरण बनवण्याची संधी भाजपच्या सरकारमधील मंत्र्यांनीही सोडली नाही.