Uttar Pradesh रामपूर येथील शिवमंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. जमावाच्या रुपात आलेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पुजारी प्रेमसिंग यांना मंदिराबाहेर काढण्यात आल्याचा गलिच्छ प्रकार घडला. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. तसेच यानंचर बेदम मारहाण करेन अशीही धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणी कट्टरपंथी अफसर अली नावाच्या कट्टरपंथींच्या पुढाकाराने जमावाने उघडपणे धमकी दिली की, जर लाऊडस्पीकर वाजवल्यास हिंदूंना गावातून हाकलून लावले जाईल आणि त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल.
Read More
मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत न उतरविल्यास देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
गेल्या काही दिवसांत कळीचा मुद्दा ठरलेल्या प्रार्थनास्थळांवरील भोग्यांबाबत राज्य सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माहिती दिली.
भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने आपले म्हणणे मांडल्यानंतर मनसेनेही याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली.
"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात ध्वनीप्रदूषण संदर्भात अतिशय चांगले अभियान चालवले आहे. मात्र यालाच जोडून आणखी एक विषय म्हणजे मुंबईत मशिदींबाहेर अनेक बेकायदेशीर भोंगे लावण्यात आले आहेत, त्यांच्यावरही योग्य कारवाई करून ते उतरवण्यात यावेत.", अशी मागणी मंगळवारी मोहित कंबोज यांनी एका व्हिडीओमार्फत केली.