अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
Read More
पुणे मेट्रोने ऑगस्ट महिन्यात एकूण ३ कोटी, ७ लाख, ६६ हजार, ४८१ कोटी रुपयांचा महसूल जमा करीत, पुणे शहरासाठी मेट्रोची ही सेवा किती आवश्यक आहे, यावरच शिक्कामोर्तब केले. दररोज सरासरी ६५ हजार, ८२२ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. स्वातंत्र्य दिनी सर्वाधिक म्हणजे ८५ हजार, ३२३ प्रवाशांची नोंद झाली. पुणे मेट्रो अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांचा ई-बाईककडे ओढा वाढला असून केवळ पुण्यात २०२२ या वर्षांत ‘इलेक्ट्रिक’वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे
लाखो मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करतात. मुंबईकरांसाठी लोकल, रिक्षा आणि टॅक्सी अत्यंत महत्त्वाची प्रवासाची साधने असल्याने त्यांच्याशिवाय मुंबईकरांचे पानही हलत नाही.
मुंबईकरांची आज सकाळपासून चांगलीच दैना उडाली. अंधेरीला पूल पडला असल्या कारणाने पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम होत असताना मध्य रेल्वेही उशिराने धावत आहे.