शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Read More
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
राज्यभरातील परिवहन विभागाच्या जमिनींवर अतिक्रमण झाले असून स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत सर्वेक्षण करत त्या जमिनी अतिक्रमण मुक्त कराव्या आणि आपल्या ताब्यात घ्याव्या, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. शुक्रवार, ४ मार्च रोजी परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
( Remove encroachments on transport department lands minister pratap sarnaik ) राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी दिले.
( minister Bawankule on action against those involved in illegal mining and transportation ) गौण खनिजांच्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर आता कठोर कारवाई होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत दिले.
केंद्रीय मोटार वाहन कायदा व व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
रिक्षा/टॅक्सी चालकाची तक्रार येताच परवानाही रद्द होणार
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
येत्या १७ मार्च पासून येथून एसटी गाड्या पुन्हा धावणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटी गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकातून धावत आहेत.
केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून या निर्णयासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.
( Pratap Sarnaik on Transport ) “रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहनचालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे ’अल्कोहोल’सोबत ड्रग्ससेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्ससेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,” अशी ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार, दि. 11 मार्च रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
पायाभूत सुविधा क्षेत्रात १ रुपयांची गुंतवणूक केल्यास स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते. हेच पाहता राज्यातील विमानतळे, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा आणि परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणावेळी सांगितले. यंदाचा अर्थसंकल्प हा प्रामुख्याने राज्यातील पायाभूत सुविधा आणि त्याअनुषंगाने इतर विभागांना चालना देणारा आहे.
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार नियमावली; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, दि.१९: प्रतिनिधी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेच्या विस्तारासह आगामी पाच परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्यादृष्टीने राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास बुधवार, दि.१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात 'उन्नत पॉडकार' वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते.
भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात(अपेडा) अॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा या डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.
जगभरात कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही त्या देशातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांवरच अवलंबून असते. अशातच सर्वात महत्त्वाचे आहे, ते रस्त्यांचे जाळे. रस्ते नेटवर्क देशाच्या वाढीचा आणि समृद्धीचा एक आवश्यक भाग म्हणून काम करतात. हे रस्त्यांचे जाळे केवळ शहरी भागाला ग्रामीण भागाशी जोडत नाहीत, तर उद्योगांना त्यांचा कच्चा माल मिळवण्यासही सक्षम करतात.
मुंबई महानगर क्षेत्रातील जास्त वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
फॅरोई बेटांमधील दोन सर्वात मोठ्या बेटांना जोडणारे, रंगीबेरंगी बोगदे परदेशी पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. हा समुद्राखालील बोगदा, जगातील अशा प्रकारचा पहिलाच आहे! ‘जेलीफिश’ राऊंडअबाऊट, अटलांटिक महासागराखालील दोन फॅरो बेटांना जोडतो. जेलीफिश वाहतूक ( Jellyfish Transport ) बेट, फॅरो बेटांवरील पर्यटकांचे नवीनतम आकर्षण केंद्र बनले आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियाना'च्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
(Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
नवी मुंबई विमानतळावर नुकतीच उड्डाण प्रमाणीकरण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. येत्या नवीन वर्षात मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या भविष्याचा वेध घेणारी हवाई वाहतूकतज्ञ आणि एमएबी एव्हिएशन संचालक मंदार भारदे यांची दै.‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेली विशेष मुलाखत.
'राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये यापुढे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल', अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये एक उपप्रादेशिक कार्यालय असावे, या मागणीला जोर धरला होता. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन परिवहन संबंधित कामे करण्याची महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला तसदी घ्यावी लागणार नाही ,ती सर्व कामे आता महापालिका क्षेत्रामध्ये त्य
जेएनपीए ते मुंबई दरम्यान सागरी मार्गाने प्रवास कार्यासाठी इलेक्ट्रिकल फेरी बोट चालविण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने घेतला आहे. ही फेरीसेवा जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती जेएनपीएने दिली आहे. या इलेक्ट्रिकल फेरी बोटमुळे मुंबई ते जवाहरलाल नेहरू पोर्ट प्रवास २० मिनिटांनी कमी होईल. म्हणजे मुंबई ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या ३० ते ४०मिनिटांवर येणार आहे.
ठाणे : वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने रस्ते वाहतुकीसोबतच आता हवेतील बस वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यासाठी बेंगलोरच्या धर्तीवर एमएमआर क्षेत्रात रोप वे द्वारे बस वाहतुकीची संकल्पना राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी व्यक्त केली आहे. सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
ठाणे : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्री पदी वर्णी लागल्यानंतरना. सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत ( ST Administration ) रविवारी (दि.२२ डिसे.) पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था,अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली, तसेच पहिल्याच दिवशी कारवाई टाळत असल्याचे स्पष्ट करून एक महिन्याचा अल्टीमेटम देताना चुकीला क्षमा नाही असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे : ( Thane ) मुंबई महानगर प्रदेश( एमएमआर) मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूकीला गती देण्याची ग्वाही केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. खासदार म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेत मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी निवेदन दिले.
राज्यातील महायुती सरकारने महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीच्या उत्पन्नात आणि प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. तब्बल ९४१ कोटी रुपये इतके उत्पन्न एसटी या महिन्यात मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. यातून एसटीला प्रतिदिन सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील
नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या ( Water Transport ) संदर्भात संसदेत नियम ३७७ अन्वये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
मध्य रेल्वेने या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५१.७३ दशलक्ष टन इतकी प्रभावी मालवाहतूक केली आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर-२०२४ महिन्यातील ६.७२ दशलक्ष टन समाविष्ट आहे. मध्य रेल्वेच्या अन्नधान्य, साखर, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या वस्तूंच्या लोडिंग क्षेत्रात कामगिरी सुधारली आहे, ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करता आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
ठाणे : प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे मनपा परिवहन सेवेचे नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना यूपीआयद्वारे डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या टीएमटीचे तिकीट ( TMT Ticket ) आता घरी बसून काढता येणार आहे. लवकरच अॅप सुरू होणार असून त्यामुळे सुट्या पैशांची कटकट मिटणार आहे.
गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,
1970 साली भारतात पहिली मेट्रो कोलकाता येथे धावली. आज मे 2024 सालच्या आकडेवारीनुसार भारतात तब्बल 902 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आहे. जे भारताला मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत जागतिक पातळीवर पहिल्या पाच देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करणारे आहे. आज जलदगतीने भारतातील मेट्राचा विस्तार पाहता, भारत भविष्यात जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असणारा देश ठरेल. त्यानिमित्ताने भारतातील जलदगतीने विस्तारणार्या मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा धावता आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) आर्थिक संकटात असलेल्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने विविध घटकांना सवलत देत प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सवलत मुल्याची रक्कम एसटी महामंडळाला सुपूर्त केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईवरुन पनवेलमार्गे लोकल ट्रेनने कर्जतला पोहोचण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बोगद्यांची कामे सध्या वेगात पूर्ण करण्यात येत आहेत.
(ST Corporation)‘राज्य परिवहन महामंडळा’कडून दरवर्षी दिवाळीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी ‘एसटी महामंडळा’कडून दिवाळीच्या कालावधीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा दिवाळीनिमित्त ‘एसटी महामंडळा’कडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरीचे रुपडे आता दिवसेंदिवस बदलते आहे. अशावेळी राज्यातील सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित करण्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या 'हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक' अभियानांतर्गत 'अ' वर्ग राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या बसस्थानकाला ५० लाखाचे बक्षीस मिळाले असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणा-या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे.
०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
देशातील शेकडो हवाईपट्ट्या कार्यान्वित करणार
पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
१ जून, १९४८ ला पुणे-अहिल्यानगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्यानिमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुलापानाचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.