महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पुन्हा एकदा वाघाचे स्थानांतरण (ट्रान्सलोकेशन) (Tiger translocation) केले जाणार असून गुरूवार दि. ११ एप्रिल रोजी ताडोबातील एक वाघीण ताब्यात घेण्यात आली आहे.
Read More
मध्यप्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामध्ये ५० रानगव्यांचे स्थानांतरण करण्यात 'भारतीय वन्यजीव संस्थान'ला (डब्लूआयआय) यश मिळाले आहे (gaur translocation). स्थानांतरण प्रकल्पामधील शेवटचे सहा गवे ८ आणि ९ एप्रिल रोजी कान्हा प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले (gaur translocation). कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचाऱ्यांनी दीड टनाचे गवे खांद्यावरून वाहून वाहनांमध्ये हलवले (gaur translocation). महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केलेल्या गव्यांनी
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्ते आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे स्थलांतर सुरू करणार आहे.राज्यातील वाघांचे अशाप्रकारचे वैज्ञानिक संवर्धनाचे हे पहिलेच स्थलांतर असेल. जास्त वाघ असलेल्या भागात वाघांची संख्या कमी करणे तसेच मनुष्य-प्राणी संघर्ष कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र वन विभागाने दि. १५ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचा उतारा म्हणून या वाघांचे त्याचठिकाणी व्यवस्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समस्येच्या अभ्यासाकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींना राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे विदर्भातील वाघांचे सह्याद्रीच्या खोऱ्यात स्थानांतरित (रि-लोकेट) करण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.