भारत आणि युके यांच्या दरम्यान व्यापारी संबंध दृढ होण्यासाठी उभय देशांमध्ये आयात-निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारत-यूके एफटीए या महिन्यात दुसऱ्या फेरीची चर्चा होणार आहे.
Read More
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ३१ मार्च रोजी नवीन परकीय व्यापार धोरण सुरू केले. FTP 2023 हे एक गतिमान आणि मुक्त धोरण आहे. असं पीयूष गोयल म्हणाले. FTP 2023 पर्यंत भारताची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल. जगभरातील US$ 760 अब्ज एकूण निर्यातीच्या आकड्यातील उल्लेखनीय कामगिरी, हे पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचे परिणाम आहे असल्याचे, यावेळी सांगण्यात आले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ‘भारताचे परकीय व्यापार धोरण २०२३ ‘जारी केले. हे नवीन परकीय व्यापार धोरण आजपासून लागू होणार आहे. यामध्ये २०३० पर्यंत भारताची निर्यात दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने बुधवारी विदेशी व्यापार धोरणांतर्गत निर्यात प्रोत्साहन योजनांसाठी भारतीय चलनात आंतरराष्ट्रीय व्यापार करारांना परवानगी दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात सेटलमेंटला परवानगी देण्यासाठी भारत सरकारने हँडबुक ऑफ फॉरेन ट्रेड पॉलिसी आणि प्रक्रियांमध्ये योग्य सुधारणा केल्या आहेत.