भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
Read More
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणारी ‘टॉय ट्रेन’ (छोटी रेल्वे) पुन्हा सुरु करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही रेल्वे सुरू झाल्यामुळे पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे. स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. अपघाताचे कारण देत ही रेल्वे बंद होती.