दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात युनायटेड किंगडममध्ये(युके) फुलपाखरू गणना करण्यात येते. हे देशव्यापी नागरिक-विज्ञान सर्वेक्षण आहे. २०१० साली सुरू झालेले सर्वेक्षण फुलपाखरांचे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण मानले जाते. २०२२ मध्ये ६४ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता आणि संपूर्ण युकेमधून ९६ हजार फुलपाखरे आणि काही दिवसा उडणार्या पतंगांची संख्या नोंदवण्यात आली होती.
Read More