इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शीख समुदायासाठी एक अनोखे पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ५ गुरुद्वारांना भेट दिली जाईल. भारत गौरव ट्रेन चालवून हे दर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा दौरा नऊ रात्री आणि १० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात नांदेड येथील श्री हुजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगर साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि भटिंडा येथील श्री दमदमा साहिबचे दर्शन घेतले जाईल.
Read More
भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना दिवाळी निमित्त विशेष भेट देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली असून, तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (प्रवासाचा दिवस वगळता) करण्यात आली आहे.
जगभरात ख्याती असणारी आणि भारतीय संस्कृतीत पौराणिक महत्व असणारी देवभूमी म्हणून ओळख असलेली उत्तराखंड नगरी होय. हे पाहता आयरसीटीसीने उत्तराखंड टुरिझमच्या सहकार्याने उत्तराखंडमधील विविध पर्यटन स्थळांसाठी आध्यात्मिक प्रवासाची मालिका सुरू केली आहे. या मालिकेत अविश्वसनीय शांत मंदिरे आणि नयनरम्य लँडस्केप्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवाशांनी भरलेल्या विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेनला शुक्रवार १४ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आयआरसीटीसी द्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, विशेष ट्रेनला हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
भारत आणि नेपाळमधील भगवान रामभुशीच्या स्थळापर्यंत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पहिल्या 'गौरव भारत' ट्रेनमध्ये ऑनलाइन बोर्ड सुविधा असेल, असे सूत्रांनी सांगितले.
कोणाकडून खाद्यपदार्थ न घेण्याबाबत देणार सल्ले ; मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचा २४ विशेष गाड्यांत उपक्रम
नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले होते. त्यानुसार, मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर १०१ पटीने नोंदणी करत समभाग ६४४ रुपयांवर खुला झाला. दिवसभराच्या सत्रात तो ७३४ रुपयांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टीवर ९५.६ टक्क्यांच्या वाढीसह तो ७४३.८० रुपयांवर पोहोचला.
नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. आयआरसीटीसी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर दरम्यान बाजारात उतरण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. २९ सप्टेंबर रोजी रविवारी शेअर बाजार बंद असल्याने ३० सप्टेंबरला हा आयपीओ खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन वर्षात आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरु केली आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीतील सफरदरजंग स्थानकातून बुधवारी रामायण एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजामध्ये ठाण मांडून बसलेल्या सामाजिक समस्यांचे ग्रहण संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.
पटनामधील दानापूर येथे ही जमिनी असून एकमेकांना जोडलेल्या ११ भूखंडांमध्ये ही जमीन विभागण्यात आलेली आहे. या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ हे जवळपास चार एकर इतके असून याचे बाजार मूल्य ४४.७५ कोटी रुपये इतके आहे.