कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची संख्या कमी झालेली असली तरी कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झालेला नाही. त्यामुळे थर्टी फस्टच्या रात्री घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका असे आवाहन कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. नियम मोडणाऱ्यावर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी दिली आहे.
Read More
२०२१ हे नववर्ष आल्याने न्यू इयर सेलिब्रेशनचे वेध लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसवर तर काहींनी सोसायटीतच न्यू इयर सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र सोसायटीच्या आवारात, टेरेसवर आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे सेलिब्रेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनच्या नावाखाली नववर्षाचे स्वागत करताना सामिष पार्ट्यांसह मद्याची नशाही केली जाते. तेव्हा, ठाणे पोलिसांची सज्जता चोख असली, तरी ३१ डिसेंबरला पोलिसांच्या नाकेबंदीचा ससेमिरा टाळण्यासाठी तर्राट चालक सर्रास उड्डाणपुलांवरून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात अपघात घडू शकतात.