रस्त्यांवरील खड्डे भरण्यात कडोंमपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे कडोंमपा आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Read More
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.