अफगानिस्तानमध्ये तालिबानी राजवटीत मुली-महिलांवर जे अमानवी निर्बंध लादले गेले, ते जगजाहीर आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने नुकतेच तालिबानचे सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुनजादा आणि मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्यावर महिला आणि मुली यांच्याविरोधात दुर्व्यवहार, अमानवी वर्तनाविरोधात अटक वॉरंट काढले. यावर तालिबानी सरकार प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने याने म्हटले की, "इस्लामिक अमिरातच्या नेतृत्वाअंतर्गत इस्लामिक ‘शरिया’च्या पवित्र कायद्याच्या आधारे अफगाणिस्तानमध्ये अद्वितीय न्याय स्थापित केले
Read More
(Russia becomes First Country To Recognise Afghanistan's Taliban Govt) रशियाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारताना रशियन सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानात २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरला आहे. जागतिक राजकारणात हा निर्णय एक
Taliban अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींवर अन्याय अत्याचार सुरुच आहे. अफगाणिस्तानात महिलांना अगदी दुय्यम स्थान दिले जाते. तालिबान सरकारचे वर्चस्व असल्याचे आता युवतींना शिक्षण देण्यापासून सरकारने विरोध केला. मात्र तालिबानी सरकारमधील एका मंत्र्याने तालिबानी युवतींना शिक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र ती मागणी संबंधित मंत्र्याच्या अंगलट आली आहे. त्यामुळे त्यांना अफगाणिस्तानातून पळून जावे लागेल, या संबंधित मंत्र्याचे नाव हे शेर अब्बास स्तानिकझाई असे आहे.
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर तेथील महिलांवर अमानुषपणे अन्याय अत्याचार सुरू आहेत. अशातच आता त्या महिलांवर निर्बंधही आणले आहेत. अशातच आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा आदेश बिगर तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. तालिबानी महिलांना रोजगार देण्याबाबत तत्काळ बंदी आणावी असा आदेश देण्यात आला आहे.
स्वयंपाक करणार्या किंवा पाणी भरणार्या स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात पाप येऊ शकते. त्यामुळे स्वयंपाक घर, अंगण किंवा विहीर नव्हे, तर घरातील महिलांचा वावर जिथे जिथे असतो, त्या त्या ठिकाणी घरात खिडकी बनवू नये, असा नवा फतवा तालिबान्यांनी ( Taliban ) नुकताच जारी केला. तालिबानी प्रशासनाचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने नुकताच तालिबानी सरकारचा हा अजब कायदा जाहीर केला. स्वयंपाकघर, अंगण आणि विहीर या ठिकाणी महिलांचा दिवसभर वावर म्हणजे, त्या दिवसभर तिथेच राबत असतात. त्या ठिकाणी खिडकी असेल, तर बाहेरचे पुरूष त्या
काबुल : २०२१ मध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानातील ( Afghanistan ) गैरइस्लामिक आणि सरकारविरोधी साहित्य काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. माहिती आणि संस्कृती मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट इस्लामिक कायद्यानुसार म्हणजे ‘शरिया’नुसार साहित्याचा प्रचार करणे आणि अफगाण मूल्यांविरोधात असलेल्या सामग्रीवर प्रतिबंध घालणे हा आहे. २०२१ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत तालिबानने इस्लामी आणि अफगाण मूल्यांविरोधात ४०० पेक्षा अधिक पुस्तके जप्त केली.
पश्चिम बंगालमध्ये तालिबान न्यायालयांचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. आता न्यू जलपाईगुडी जिल्ह्यात एका महिलेने जमावाच्या मारहाणीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. एका मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून महिलेला मारहाण करून अपमानित करण्यात आले होते. महिलेला त्रास देण्यासाठी या कांगारू कोर्टचे आयोजन केल्याचा आरोप टीएमसी नेत्री आणि तिच्या पतीवर आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.
इस्लाम खतरे में हैं’, ’व्होट जिहाद’ असे शब्द देशात अनेक वेळा आपल्या कानावर येत असताना, जगात मात्र बदलाचे वारे वाहत आहेत. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानने त्यांच्या देशात असलेली हिजाबवरील सक्ती नुकतीच उठवली आहे. यासाठी ताजिकिस्तानच्या संसदेने रीतसर कायदा करून हिजाबबंदी जाहीर केली. ताजिकिस्तान हा मध्य आशियामधील तालिबानशासित अफगाणिस्तानच्या सीमेवरील देश. या देशाच्या चारही सीमा या जमिनीने वेढलेल्या. त्यापैकी दक्षिणेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे किर्गिझस्तान, पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे उझबेकिस्
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्यासाठी, ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला घडवून आणला का, हा प्रश्न आहे. हिंसाचाराला बळ देणारी, ममता बॅनर्जी यांची तालिबानी प्रवृत्तीच यामागे आहे. संदेशखाली प्रकरणातील शाहजहान शेख याला पाठीशी घालणार्या, ममता बॅनर्जी याच होत्या. आता बॉम्बस्फोटातील आरोपींची पाठराखण त्या करत असल्याचे दिसून येते.
अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेतील एका भारतीय व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव सनाउल इस्लाम असून तो केरळचा रहिवासी आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी तो अफगाणिस्तानला पोहोचला होता. त्यादरम्यान तालिबानने त्याला अटक केली. मात्र, भारतीय तपास यंत्रणांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
कतार हा पश्चिम आशियातील २७ लाख लोकसंख्येचा छोटासा देश. पण, आज जगभरातील वादविवादांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी जागतिक महासत्तांनासुद्धा याच देशाची मदत घ्यावी लागते. गॅस आणि तेलाच्या साठ्यातून जगातील श्रीमंत देशांच्या यादीत जाऊन बसलेला कतार आपल्या अनोख्या कूटनीतीमुळे जगात एक विशेष स्थान राखून आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...
"तालिबानच्या मानसिकतेवर एकच उपाय आहे, तो म्हणजे बजरंग बलीची गदा." असे विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायलच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे कौतुक करताना केले आहे. राजस्थानमधील तिजारा जिल्ह्यात एका सभेत बोलत होते.
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शक्तिशाली भूकंप झाल्याने २ हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी, सुदैवाने, कुठलीही जीवित व वित्तहानी झाली नाही. तसेच, गेल्या आठवड्यातही हेरात प्रांतात ६.३ रिश्टर स्केल भूकंपात २५०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
सध्या जगाच्या पाठीवर सगळ्यांचे लक्ष आहे-ते इस्रायल आणि ‘हमास’मध्ये पेटलेल्या घनघोर युद्धावर. हे युद्धही रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच लांबण्याचीच चिन्हे अधिक. पण, याच दरम्यान अफगाणिस्तानातील भीषण भूकंपाच्या बातमीनेही जगाला अगदी हादरवून टाकले. त्याचे कारण म्हणजे, अफगाणिस्तानमधील भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ६.३ इतकी नोंदवण्यात आली.
अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टल स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे तब्बल २ हजार जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, या शक्तिशाली भूकंपामुळे अफगाणिस्तानातील ग्रामीण घरे उध्वस्त झाली तर भूकंपाने भयग्रस्त झाल्याने शहरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
अफगाणिस्तानातील हेरात प्रांताच्या राजधानीच्या वायव्येस ३० किमी अंतरावरील भागांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या धक्क्यामुळे तब्बल २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने मोठा निर्णय घेतला.
पाकिस्तानमध्ये या वर्षात आतापर्यंत एकूण २४ आत्मघाती बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्याबाबत पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांचे म्हणणे आहे की, यापैकी १४ हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानातील निर्वासितांचाही हात आहे. तरी, तालिबान प्रशासनाचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानमध्ये यावर्षी आतापर्यंत २४ आत्मघातकी हल्ले झाले. त्यापैकी १४ आत्मघातकी हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानच्या व्यक्ती गुन्हेगार आहेत. तसे पाकिस्तानकडे पुरावे आहेत. पाकिस्तानमध्ये ४.४ दशलक्ष लोक अफगाणिस्तानहून आलेले निर्वासित म्हणून पाकमध्ये वास्तव्यास आहेत.
अफगाणिस्तानात बिगर मुस्लिमांना नाममात्र उरले आहे. पण त्यांनाही तालिबानच्या राजवटीत कठोर निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. हिंदू-शीख महिलांना बुरखा आणि निकाब घालण्याची सक्ती केली जात आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी सणही साजरे करता येत नाहीत.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. या घटनेला आता दोन वर्ष झाली आहेत. अफगाणिस्तानमधील राजकीय कार्यात सहभागी होणे म्हणजे स्वतःला अडचणीत आणण्यासारखे आहे. असे करताना कोणी पकडले गेले तर त्याची तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. . वास्तविक, तालिबानच्या अंतरिम सरकारने अफगाणिस्तानमधील राजकीय पक्षांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयामागे शरिया कायद्याचा हवाला देण्यात आला आहे.राजकीय पक्ष देशात फाळणीची भावना निर्माण करतात ,जे विकास
अफगाणिस्तानातील महिलांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबान एकामागून एक निर्णय तिथल्या महिलांवर लादताना दिसत आहे. आता तालिबानकडून १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाता येणार नाही असा नवा फर्मान जारी करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, अफगाणिस्तानच्या काही प्रांतांमध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत जाण्यास नकार दिला जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे बहुसंख्य मुसलमान अक्षरशः जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळण्याच्या तयारीत होते, हे जगाने पाहिले. ७२ टक्के लोक गरीब असलेल्या अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानी राजवट आली, तेव्हा ९७ टक्के लोक दारिद्य्राच्या दरीत लोटले गेले, तर अशीही तालिबानी राजवट.
अफगाणिस्तानातील लोकांच्या मदतीसाठी भारत पुन्हा एकदा पुढे आला आहे. यापूर्वी, भारताने ४०,००० मेट्रिक टन (४० दशलक्ष किलो) अन्नधान्य अफगाणिस्तानला पाठवले आहे. आता भारताने पुन्हा २०,००० मेट्रिक टन (२० दशलक्ष किलो) अन्नधान्य अफगाणिस्तानला पाठवण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे यावेळी अन्नधान्याची ही खेप पाकिस्तानला पाठवली जाणार नाही, तर इराणच्या चाबहार बंदरातून पाठवली जाणार आहे.
मुंबई/अफगाणिस्तान : अफगाणिस्तानातील दोन प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थिंनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या विषबाधेमुळे ८० मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्राथमिक शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोन्ही शाळा उत्तर अफगाणिस्तानातील सार-ए-पुल प्रांतातील संगचारक जिल्ह्यात आहेत. नसवान-ए-कबाड अब स्कूल आणि नसवान-ए-फैजाबाद स्कूलमध्ये या शाळेत हा प्रकार घडला आहे.
महिलांनी आता खुल्या पार्कमधील रेस्तराँमध्ये जाणेही गुन्हा. कारण काय तर म्हणे लोकांनी आणि मुख्य म्हणजे धार्मिक गुरूंनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, महिला या रेस्तराँमध्ये डोकं आणि चेहरा झाकलेला पोशाख घालत नाहीत. आपला चेहरा किंवा केस इतरांना दिसू नयेत, यासाठी विशेष लक्ष देत नाहीत. इतकेच नव्हे, तर पुरूषांना त्या दिसू शकतात तरीसुद्धा त्या तिथे बसतात, नाश्ता करतात किंवा जेवतात. भयंकर पाप आहे. या पापाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी मग अफगाणिस्तानातील हेरात प्रांतामध्ये महिलांना खुल्या रेस्तराँमध्ये प्रवेश करण्यास
"आम्ही महिलांचा अधिकार आणि हक्कांचे अजिबात हनन केलेले नाही. या विषयाचा गैरवापर करून संयुक्त राष्ट्र संघाने आणि इतरांनीही अफगाणिस्तानच्या विद्यमान सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये,” असे मत तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने व्यक्त केले. कारण, नुकतेच म्युनिक सुरक्षा संमेलन पार पडले. त्यामध्ये सहभागी झालेल्या विदेशमंत्री, त्यातही दहा महिला विदेशमंत्र्यांनी अफगाणिस्तानमध्ये महिलांवर लादल्या गेलेल्या नियमांची निंदा केली होती. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांवर अमानुष नियम लादले गेले तसेच त्यांचे
पाकिस्तानमधील सोमवारच्या पेशावरच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने पुनश्च या देशातील सुरक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघालेच. पण, या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांमधील अक्षम्य अपयशाचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तालिबान आणि भारतावर दोषारोपणाचीच पुनरावृत्ती सवयीप्रमाणे पाक सरकारने केली असली तरी हा देश अखेरच्या घटका मोजतोय, त्याचाच हा बॉम्बहल्ला आणखीन एक पुरावा...
दि. २८-२९ जानेवारीला नाशिकला अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक सरकारमान्य विद्वान आणि साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाच्या दोन दिवसांत पाच परिसंवाद होणार आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘मुस्लीम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि दुसरा ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर होणार आहे. हे दोन्ही परिसंवाद हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तरीही या परिसंवादात पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यांना ‘उजवे विचारवंत’- 'A
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
तिने ट्रेनमध्ये महिलांशी वाद घातला. ‘हिजाब’ घालणार्या महिलांशी तिने ‘हिजाब’वरून वाद घातला होता. वाद घालताना तिने ‘हिजाब’ परिधान केला नव्हता. तिला पोलिसांनी पकडले. तिच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, देशविरोधी विचार पसरवला, असा गुन्हा तिच्यावर दाखल झाला. तिला बहुतेक 16 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होणार. हे कुठे घडत आहे, तर इराणमध्ये आणि ती ‘हिजाब’च्या विरोधात विधान करणारी महिला आहे. इराणी कलाकार लेखिका सेपदेह रोश्नो. इराणी महिलांना ‘हिजाब’ घालणे अनिवार्य आहे.
अफगाणिस्तानचे भविष्य हे केवळ आपल्याच हातात असून ते आपण उत्तम प्रकारे घडवू शकतो, हे तालिबानने त्यावेळी अनेकदा सांगितले. मात्र, आजमितीस अफगाणिस्तानमधील तालिबानचे स्थान डळमळीत असल्याचेच दिसून येत आहे
भारताने ‘इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान’ला किंवा तेथील तालिबान सरकारला अजूनही मान्यता दिली नसली तरी त्यांच्याशी चर्चेची दारं मात्र उघडी ठेवली आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे हे मोठे यश आहे.
नुकतेच अफगाणिस्तानातील काबूल येथे मदरशामध्ये आत्मघातकी हल्ला झाला. त्यात ‘हक्कानी नेटवर्क’चा धार्मिक गुरू असे अधिष्ठान प्राप्त झालेल्या रहिमुल्ला हक्कानी, त्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि भाऊ यांचा मृत्यू झाला
तालिबानने जवाहिरीच्या हत्येचा निषेध केला, तर ‘इस्लामिक जिहाद`ने इस्रायल विरुद्ध एक हजारांहून जास्त रॉकेट्सचा मारा केला. इस्रायलने गाझामधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तसेच ‘इस्लामिक जिहाद`कडून इस्रायलवर डागलेले रॉकेट गाझामध्येच पडून ४४ पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट येऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तालिबानला अफगाणिस्तानमधील सत्तेवर आपली पकड अद्याप पक्की करता आलेली नाही.
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री सलग दुसर्यांदा विराजमान झाल्यानंतर योगींच्या अनेक निर्णयांची चर्चा देशभरात होत असते.
इस्लामिक कट्टरतावादी तालिबान्यांचे सरकार अफगाणींचे भले करेल, अशा भाबड्या आशेवर जगणारा एक गट आजही जगाच्या पाठीवर सक्रिय आहे. अफगाणींना त्यांच्या नियमांनी, शरियाच्या कायद्यानुसार जगू द्यावे, पाश्चिमात्त्य संस्कृती त्यांच्यावर लादण्याची गरज नाही वगैरे वगैरे यांचे तथाकथित उदात्त विचार. पण, तालिबानने अफगाणिस्तान ओरबाडून घेतल्यापासून ते आजतागायत ना त्या देशाचे काही भले झाले ना तेथील गरीब जनतेचे. उलट आधीच गरिबीत पिचलेल्या सर्वसामान्य अफगाणींना तालिबान शासनाने आर्थिक समस्यांच्या खोल गर्तेत ढकलले.
अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळ तळ ठोकला. हजारो कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांचा वापर अमेरिकेद्वारे करण्यात आला. मात्र, तरीदेखील तालिबानचा निर्णायक सफाया करणे त्यांना साध्य झाले नाही. अखेरीस अमेरिकेला अतिशय अपमानास्पदरित्या अफगाणिस्तान सोडावे लागले. ता तालिबानची राजवट कुठे स्थिरावताना दिसत असतानाचा पुन्हा तेथे ईदनंतर ‘ऐलान-ए -जंग’ होताना दिसत आहे
"मुख्यमंत्री गेहलोत यांच्या राज्यात राजस्थानमध्ये तालिबानी शासन लागू झाले आहे. हिंदूंना त्यांचे सण- उत्सव साजरे करण्यापासून रोखले जात आहे, भीतीचे वातावरण तयार केले जाते आहे" असा आरोप राजस्थानमधील भाजप नेते सतीश पुनिया यांनी केला आहे
रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असताना, चीनचे आशियाई आणि आफ्रिका खंडात विस्तारवादाचे आक्रमण सुरू असताना तालिबानी सरकारने ही छापेमारी का केली असेल? त्यांना कसले भय असेल? ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे किंवा चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक!
काबुल : अफगाणिस्तानावर दहशतीने कब्जा करणाऱ्या तालीबाननेही आता युक्रेनसाठी भूमिका घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याबद्दल सल्ला दिला आहे. तालिबानने म्हटल्या प्रमाणे, दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा. ज्यामुळे हिंसाचार ukraine russia war
अफगाणिस्तानमधील मलाला नावाच्या मुलीला चंदीगडमधील मुलाशी लग्न करण्याच्या धमक्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला तालिबानची भीती वाटते. त्यांना पाकिस्तान, इराण, इराक आणि अरब देशांतून धमकीचे फोन येत आहेत. तक्रार आल्यानंतर चंदिगड पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे.
गेल्या वर्षी अध्यक्ष जो बायडन यांच्या निर्णयानंतर अमेरिकन सैनिकांनी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमधून माघार घेतली अन् इस्लामी कट्टरतावादी तालिबान्यांची सत्ता आली, त्याला आता सहा महिने उलटून गेले.
पाकिस्तानला सध्या तालिबानकडून धोका वाटत चिन्ह दिसत आहेत. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे सध्या पाकिस्तान चिंतेत आहे.
अफगाणिस्तानातून अमेरीकन सैन्य मागे घेतल्यानंतर आपण अमेरिकेसाठी काहीतरी मोठा निर्णय घेतल्याचा आव राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आणला होता. मात्र, तो सपशेल फोल ठरला. दहशतवादाला समूळ नष्ट करण्याच्या बाता फक्त घोषणाच ठरल्या हे दिसून येईल.
भीषण गरिबी आणि गंभीर अन्न असुरक्षितता याचा परिणाम अफगाणिस्तानच्या शेजारी देशांसह संपूर्ण प्रदेशावर होण्यास प्रारंभ झाला आहे. शेजारी इराण आणि पाकिस्तान या देशांमध्ये स्थलांतर सुरू झाले आहे. करोना संसर्गाच्या दरम्यान असे स्थलांतर होणे हे डोकेदुखी वाढविणारे ठरत असून आर्थिक आव्हाने अधिकच तीव्र होत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग, तालिबानी राज्यकर्ते, आर्थिक संकट आणि दुष्काळ यामुळे अफगाणी जनता विचित्र संकटात सापडली आहे.
“इच्छेप्रमाणे कपडे परिधान करणे, शिक्षण घेणे आणि काम करणे हा आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या विरोधातली हिंसा थांबवायलाच हवी. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला सहभाग हवाच,” अशा आशयाच्या मागण्या दि. ११ जानेवारी रोजी अफगाणिस्तानातील भिंतीवर लिहिलेल्या दिसल्या. तसेच या मागण्यांना समर्पक अशी चित्रेही काढण्यात आली होती. तालिबानी सत्तेत नसते तर त्यांनी या मागण्या करणार्यांचा गळाच चिरला असता. पण, तालिबानी आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आहेत. मात्र, जगातल्या बलाढ्य देशांन
हमीद करझाई अंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख अमेरिकेला यश आले आहे.
"आम्हा २० करोड लोकांची ही मातृभूमी आहे. आम्हा २० करोड लोकांना कोणी नष्ट करू शकत नाही. जर असे कोणी बोलत असेल तर आम्ही लढू! मला विश्वास आहे की, अशा लोकांना चोख उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत.” सरफरोश चित्रपटात ‘होशवालों को खबर क्या’ म्हणत देशद्रोही व्यक्तीची भूमिका अगदी मनापासून रंगवणाऱ्या नसीरूद्दीन शाहचे वरील उद्गार! छत्तीसगढ येथे धर्म संसद झाली.
ऑगस्ट महिन्यात तालिबानने हळूहळू अफगाणिस्तान गिळंकृत केले. त्यानंतर तिथे जे काही अराजक माजले, ते अख्ख्या जगाने विविध माध्यमांतून पाहिले, वाचले. तालिबानच्या अधिपत्याखाली आलेला हा देश जणू आता आपला नाहीच, म्हणून परकीयांनी आक्रमण केल्याप्रमाणे अफगाणी नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आपल्याच देशातून पलायन करण्यासाठी जीवाचे अक्षरश: रान केले. काहींनी तर चक्क ट्रकप्रमाणे विमानावर चढून आपला जीवही गमावला. पण, त्या अनागोंदीतून दिसून आली ती सामान्य अफगाणी माणसाची अगतिकता अन् हतबलता.