Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
Read More
MK Stalin भारतात पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये मतदारसंघात परिसमीन होणार आहे. या अंतर्गत लोकसंख्येच्या आधारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागांची संख्या आणि मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी यावर राजकारण सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तामिळनाडू लोकसभेत कमी जागा होतील, असा दावा स्टॅलिन यांनी केला. सध्या तामिळनाडूत लोकसभेत ३९ जागा आहेत.
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
MK Stalin मधमाश्यांच्या पोळावर दगड मारू नये. हे प्रकरण भडकवू नये असा दावा आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले आहे. मोदी सरकारने आणलेल्या राष्ट्रीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. भाषिक आधारावर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा बेताल दावा स्टॅलिन यांनी केला आहे. त्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही तमिळनाडू सरकारवर सुधारणांप्रति रुपांतरीत करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) मंत्री उदयनिधी स्टॅलिनला बिहारमधील अराह जिल्ह्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने सनातनवर केलेल्या टिप्पणीबद्दल समन्स बजावले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे कोर्टाने म्हटले आहे. स्टॅलिनला दि. १ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने याप्रकरणी भादंवि कलम २९८ अन्वये दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या समर्थकांनी लावलेला पोस्टर्समुळे त्यांचीच फजिती झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी एमके स्टॅलिन यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले होते. पण त्यांनी या पोस्टरमध्ये मोठी चूक केली. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांच्या पक्षाला ट्रोल केले जात आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दि. ३ मार्च २०२४ रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ए राजा यांनी हिंदुविरोधी आणि अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. 'जय श्री राम'चा नारा दिल्याबद्दल ए राजाने हिंदूंना 'मूर्ख' म्हटले. एवढेच नाही तर भारत हा देश नसल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
इंडी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी (10 डिसेंबर) ट्विट करत ही माहिती दिली. मात्र, 17 डिसेंबरपासून बैठक का पुढे ढकलण्यात आली, याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव यांनी 17 डिसेंबर रोजी विरोधी गटाची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की, दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) अटक करेल. पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. वास्तविक, केजरीवाल यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी मद्य घोटाळ्यासंबधी चौकशीसाठी बोलावले आहे.
"रामाचा जन्म ही पौराणिक कथा आहे. ही रामायणाची कथा आहे. हे साहित्य आहे. त्यांना इतिहासाची जागा पौराणिक कथांना द्यायची आहे." असे वादग्रस्त आणि भगवान रामाचा अपमान करणारे विधान डीएमके नेते टीकेएस एलांगोवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता हिंदुस्तानी भाऊने ही उदयनिधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणाले की, " सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा असून त्याला नष्ट करायला हवे, असे विधान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी लक्षात घ्यावे की, सनातन धर्म संपवण्यासाठी असे अनेक जण आले. पण सनातम धर्म संपला नाही, तर ते लोकचं संपले. तसे
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, असं म्हणतात. ज्याची प्रचिती सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादावरून दिसून येते. ‘कावेरी जलव्यवस्थापन मंडळा’ने कर्नाटक सरकारला दि. १५ ऑक्टोबरपर्यंत दररोज तीन हजार क्यूसेक पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिले होते.
तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आगमिक मंदिरांमध्ये पुजारी नियुक्तीमध्ये सरकारी बळजबरी करण्यास मनाई करणारा 'स्टे ऑर्डर' दिला आहे आणि म्हटले आहे की ,'सरकारने हिंदू धर्माच्या प्रत्येक परंपरेत जबरदस्ती घुसू नये', असे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला सांगितले आहे. तसेच पुरोहितांच्या नियुक्तीतील मनमानी व बेकायदेशीर कारभारावर सुप्रीम कोर्टाकडून बंदी घातलेली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद थांबत नाही आहे. दरम्यान, आता या सनातन वादात प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनी उदयनिधी यांचा बचाव करत सनातनच्या वादात एका मुलाला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे. पेरियार यांच्याकडून आम्हाला सनातनची माहिती मिळाली, असेही कमल हसन म्हणाले.
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज एका कार्यक्रमात द्रमुक नेत्यांनी सनातन आणि हिंदू धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. राज्यपाल आर.एन.रवी म्हणाले की, "तेच लोक हिंदू धर्माच्या विनाशाबद्दल बोलत आहेत, ज्यांना देश तोडायचा आहे."
सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समुच्चय असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. उदयनिधी स्टॅलिन याने सनातनविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सनातनविरोधात होत असलेल्या वादविवादांबद्दल न्यायालय जागरूक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन हा केवळ निमित्तमात्र. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधणारी देशविरोधी काँग्रेस, ही त्याची बोलवता धनी आहे.
"तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. जर्मनीत हिटलरने ज्यू लोकांबद्दल जी भाषा केली होती, त्याप्रमाणे उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं हे विधान आहे.
सनातन धर्माविषयी अपशब्द बोलणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याविरोधात २६२ व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. या २६२ व्यक्तींनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे.
तामिळनाडू सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली असून ईडीच्या रडारवर असणारे हे दुसरे मंत्री आहेत. दरम्यान, याआधी दि. १४ जुलै रोजी तामिळनाडू सरकारचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.
शरद पवार यांनी नुकतेच २ मे रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संपुर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र दि. ४ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची चर्चा माध्यामातून रंगत आहे. शरद पवार यांच्या राजीनामा घोषणेनंतर दोन्ही नेत्यांनी फोन करून पवारांनी राजीनामा का दिला? याबाबत माहिती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका आहे...
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ने दि.१६ एप्रिल रोजी तामिळनाडूच्या ४५ भागात भव्य रोड शो अयोजित केली होती. याआधी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने राज्यात रा.स्व.संघाच्या या कार्यक्रमावर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रोड शोचा मार्ग मोकळा झाला . तसेच कडक सुरक्षा व्यवस्थेत स्वयंसेवकांनी ढोल आणि काठ्यांचा उपयोग करून परेडदेखील केली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अत्यंत घनिष्ट असे नेते म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन प्रसिद्ध आहेत. मागील काहीच दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र दौरा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच शरद पवार आणि इतर मुख्य नेत्यांची भेट घेतली होती.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या सरकारने राज्यातील मंदिरांचे सोने वितळवून २४ कॅरेट सोन्याचे बार बनवणार
व्ही. नारायणसामी यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी सध्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध राज निवासाबाहेर ‘धरणे’ आंदोलन सुरू केले आहे. व्ही. नारायणसामी यांना नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरुद्ध ही सर्व नाटकबाजी का करावी लागली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
करुणानिधी हे स्वतः तब्बल ४९ वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिले होते व त्यांच्या आजारपणादरम्यान स्टालिन हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते