मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी SDRF पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच TDRF च्या धर्तीवर पालिकांनी पथकं सुरु करावेत. ज्यामुळे लोकांची तात्काळ मदत करता येईल.त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी.स्थानिक तरुणांना बचावकार्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावे,असे ही शिंदे म्हणाले.
Read More
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश... देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रेचा प्रारंभ गुरुवारी ठाण्यात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. विविध प्रभागसमिती क्षेत्रात मार्गक्रमण करीत या अमृतकलशामध्ये नागरीकांकडुन माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत सुरु असलेले बचावकार्य थांबविण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.२३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच, इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे असून या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट, रूपादेवी पाडा येथील ठाणे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ) २३ जुलै रोजी सकाळी फुटल्याने खळबळ उडाली.