पालघर जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊसाची अवकळा सुरूच असून 21 मार्च रोजी सकाळी धुमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी शेती, फळ बागायत, वीट भट्ट्यां, मिठागरे, जनावरांचा सुका चाराआणि वाळायला टाकलेल्या सुक्या मच्छीला फटका बसला आहे. वरील व्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याने या अर्थव्यवस्थेला याची झळ बसणार आहे.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद ने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. या उपक्रमात धसई, मुरबाड जवळील वनवासी पाड्यात २३० वनवासी भगिनींना साडी व मिठाई भेट देण्यात आली.
मुंबईकरांचा 'इंडियन बर्गर' मानला जाणारा चटपटीत वडापाव महागण्याची शक्यता आहे. चणाडाळीचे पीठ (बेसन), बटाटा आणि अन्य पदार्थांच्या किंमती वाढल्याने १२ रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपयांना मिळणार आहे. वडापावसह मिळणाऱ्या समोसा, कटलेट आणि भजी प्लेट आदींचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. भजी प्लेटची किंमत चार ते पाच रुपयांना वाढणार आहे.
आपल्या आत्मसंयमाच्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यात एका बाजूला देव असतात आणि दुसर्या बाजूला दानव असतो आणि त्याची भीषण लढाई सतत चालू असते. आपल्या सर्वांना मात्र असं वाटतं की, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्या व्यक्ती ही लढाई उत्तम लढतात.