Swaranjali

राहुल गांधी म्हणतात ट्रम्प बरोबर; पण शरूर यांनी केला विरोध!, म्हणाले "हे पूर्णपणे चुकीचे"

खासदार शशी थरूर यांनी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त कर पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे दरम्यान, संसद भवनाबाहेर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने हा कर अश्यावेळी लावला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये कारवाई व्यापारसंबधातील चर्चा अजूनही सुरू आहे, अमेरिकेने अचानक लादेलेल्या २५ टक्के कराने दोन्ही देशांमधील व्यापार संवादातील वातावरण बिघडू शकते.

Read More

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि भार

Read More

‘पिस्को' जीआय टॅगच्या वादाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रेडमार्क आणि जीआय मधील फरक केला स्पष्ट

पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा,१९९९’ मधील मुलभूत फरक स्पष्ट केला आहे. पेरू आणि चिली या दोन दक्षिण अमेरिकन देशांमधील संघटनांदरम्यान सुरू असलेल्या जीआय हक्कांवरील संघर्षावर सुनावणी करताना, जीआय आणि ट्रेडमार्क कायद्याचे स्वरूप आणि हेतू पूर्णत: भिन्न असल्याचे उच्च न्यायालयाने

Read More

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात

Read More

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121