ए रवी कामाच्या ठिकाणी किंवा अगदी नातेवाईकांशी संवाद साधताना जपून वगैरे बोलण्याचा सल्ला आजही घरच्या ज्येष्ठांकडून आवर्जून दिला जातो. राजकारणात तर डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवूनच संवाद साधावा, हा सर्वश्रुत नियम; अन्यथा त्याचे किती भीषण परिणाम सहन करावे लागतात, ते गल्लीपासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत आपण जाणतोच. पण, विषय नातेवाईक, राजकारणाचाही सोडा, त्याही पलीकडे परराष्ट्र संबंधाचा, कूटनीतीचा असेल, तर तिथे शब्द अन् शब्द हा अत्यंत काळजीपूर्वकच वापरायला हवा. मग ते राजदूत असो वा साक्षात देशाचा पंतप्रधान.
Read More
मणिपूरमधील मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांच्या अटकेनंतर शनिवार, दि. 7 जून रोजी रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यानंतर रात्री 11.45 वाजल्यापासून मणिपूर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.ज्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे त्यात धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा, सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा, कुतलाहारचे आमदार देवेंद्र भुट्टो, गाग्रेटचे आमदार चैतन्य शर्मा, लाहौल स्पितीचे आमदार रवी ठाकूर आणि बडसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच खासदार अमोल कोल्हे यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेदरम्यान पवित्र अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाल्याने किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, सुमारे ३०-४० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने विविध बेस कॅम्प्समध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेतले आहे.
विधानसभेच्या अधिवेशनावेळी भाजप आमदारांनी गैरवतुर्णक केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर हे निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीकरिता राजभवनावर पोहोचले आहेत. भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्र्यांच्या समावेश आहे.
अभिनेत्री कंगना रनौतअभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत कंगनाने ट्विट केले होते. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या कारवाईची मागणी केल्यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाउंट निलंबित केले आहे.चे ट्विटर अकाउंट सस्पेंड
न्यायालयासमोर केंद्र सरकारची ठाम भूमिका
परिवहन विभागाकडून २८ मोटार वाहन निरिक्षक व ९ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अमळनेर नगरपालिकेतील मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुटे यांना आज प्रशासनाने तातडीने निलंबित केले. यामुळे शहरातील राजकीय, नपा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.