नावात अंधार असल्यावर बुद्धीतही अंधार असावा, हा निव्वळ योगायोग मानायचा का? हो. पण, हिंदूंना शिव्याशाप देणार्या त्यांच्या श्रद्धांची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारेबद्दल हा योगायोग घडला आहे बरं. त्यांनी नुकताच प्रश्न विचारले, मद्यपान करणे हा गुन्हा आहे का? पुण्यातल्या रेव्ह पार्टीबद्दल त्यांनी म्हणे हा प्रश्न विचारला आहे. अंधारेंचे म्हणणे आहे की, ती हाऊस पार्टी होती, रेव्ह पार्टी नव्हती. अर्थात ती हाऊस पार्टी आहे का, रेव्ह पार्टी आहे, याचे अगाध ज्ञान अंधारेंना असणार, त्याशिवाय का त्या इतक्या अधिकारवाणीने बोल
Read More
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सोमवार, दि. २८ जूलै रोजी, सकाळी ११:३० वाजता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भातील मागण्या घेऊन ठाकरे गटाचे नेते राजभवनावर दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह सुषमा अंधारेही उपस्थित होत्या.
उबाठा गट, नीचपणाचा अजून किती तळ गाठणार? असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागत भारतीय सैन्याचा अवमान केला. या कार्यक्रमात केशव उपाध्येसुद्धा उपस्थित होते.
कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवर हक्कभंग! कारवाईंबद्दल काय म्हणाले आमदार प्रसाद लाड
उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्या पक्षप्रवेशासाठी निरोप पाठवला होता, असा गौप्यस्फोट आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात, असा पलटवार आमदार चित्रा वाघ यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारेंना शिवसेना किती माहिती आहे? कोण आहेत या बाई? असा सवाल शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला आहे. यामिनी जाधव यांनी त्यांच्या भायखळा मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरून उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा म्हटलं तिलाच प्रक्षाचा प्रवक्ता बनवलं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. रविवारी शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भरसभेत सुषमा अंधारेंचा जूना व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पक्षाला राम राम ठोकल्याने उद्धव ठाकरेंना चांगलाच दणका बसला आहे. काही नालायक लोकांमुळे पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पक्षात अंधार सेनेचं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात झाली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती दिली.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गुरुवार, दि. ४ जानेवारीला गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर भादवि कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या भोवतीच महाराष्ट्राचे राजकारण केंद्रित राहणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले. म्हणजे मी आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहोत, म्हणजे मी राष्ट्रीय नेता नाही? माझ्या भोवती केवळ महाराष्ट्राचे राजकारण फिरणार, भारताचे राजकारण नाही? काही लोक म्हणतात, निवडणुकीत आम्ही दोघे हरणार आहोत. तेव्हा महाराष्ट्राने नाकारलेले नेते म्हणून राजकारण आमच्या भोवती केंद्रित राहील असं संजयला सांगायचे आहे. असो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी (२४ ऑक्टो.) आझाद मैदानात पार पडला. या मेळाव्याची सुरुवात ज्योती वाघमारे यांच्या भाषणाने झाली. ज्योती वाघमारेंनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धवजी तुमचं आडनाव ठाकरे नव्हे वाकरे ठेवा. संजय राऊत यांना शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. ते भाकरी मातोश्रीची खातात, पण चाकरी राष्ट्रवादीची करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशारा दिला.
आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. १८ जून रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर १९ मे रोजी कायंदेंनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे गट सोडण्याची कारणे सांगितली. अधिकृत शिवसेना ही शिंदेंचीच आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. असं मनीषा कायंदे यांनी यावेळी सांगितलं.
आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. ज्यांनी आपल्या देवीदेवतांना शिव्या दिल्या त्यांना उबाठा गटात चेहरा म्हणून वापरलं जातंयं, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. त्यामुळे अंधारे यांनी गौतमीला सपोर्ट केला. इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून ती वाईट आहे, असे मी म्हणणार नाही. ती तिच्या पोटासाठी खूप महत्त्वांच काम करत आहे. कुणाचा तळतळाट घेऊन वाभाडे काढून नाव ठेवून सुषमा अंधारे यांनी तिची लोकप्रियता जपली आहे, असे शिरसाट म्हणाले.
कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंसह उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. मिटकरी म्हणाले की, उद्धवजी मी तुमचा आदर करतो.पंरतू आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. अन्यथा गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील, असा इश
इतक्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाली, ऐकून वाईट वाटलं. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे मारहाण प्रकरणावर दिली आहे. संजय शिरसाट यांनी खोचक शब्दांत अंधारेंवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विकायला काढल्याने आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला.
जसा पक्षप्रमुख तसे नेते, सुषमा अंधारेंची यात काही चूक नाही. असं म्हणत आ. नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दादागिरी करतात म्हणून त्यांना दोन कानशिलात लगावल्याचा दावा केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. यावर नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"जिकडं राशन तिकडं भाषण! सुषमाताई हे खरं आहे का?" असं म्हणत शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे, बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला तरी सुषमा अंधारे म्हणतील ही शिंदे गटाची स्क्रिप्ट आहे. असं म्हणत ज्योती वाघमारेंनी अंधारेंवर निशाणा साधला
उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दहा कामं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा. असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा समाचार गजानन काळे यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेले आहेत. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये. आयोजकांनी सकाळची वेळ घ्यायची नव्हती. हा एक अपघात आहे. या अपघाताचं काय राजकारण करायचं? असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या विधानावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्राद्वारे पलटवार केला आहे.
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. ते ट्विट मध्ये म्हणाले, "सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी आहेत." तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्यानंतर शिवसेनेचे ‘धनुष्य’ पेलू न शकणार्या उद्धव ठाकरे यांनी मूळ शिवसेनेच्या विचारांनाच मुठमाती दिली. निमित्त होते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचे! उद्धव यांनी खुर्चीच्या मोहात शिवसेनेचे सत्व सोडले. त्यामुळे सत्तेत असूनही मूळ शिवसैनिकांत असंतोष खदखदत होता. त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत संपूर्ण शिवसेनाच ताब्यात घेतली. आजघडीला उद्धव यांच्याकडे पक्षही नाही, चिन्हही नाही, आमदार-खासदार आपल्या कार्यकर्त्यांसह
सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका केली हेाती. त्याला कडू यांनी प्रत्युत्तर दिले. "अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना १९ हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही." असे कडू म्हणाले.
जे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हातचे शिवबंधन टिकवू शकले नाहीत, ते आता मोदीविरोधकांच्या महागठबंधनाची गाठ घट्ट करण्याची भाषा करू लागले. याकुब मेमनचे समर्थन ते आता खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्या केजरीवालांच्या ‘मातोश्री’वारीने, ठाकरेंची चुकलेली राजकीय दिशा आणि दशाच पुनश्र्च अधोरेखित होते.
एखाद्या चोराने जर चोरी केली आणि त्याला पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं, तर आपला गुन्हा लपविण्यासाठी तो इतरांनाच दोष देतो किंवा आपण चोरी केलीच नसल्याचा दावा करून नामनिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. यालाच म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा.’ असाच काहीसा दावा राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. संजय राऊत असोत जितेंद्र आव्हाड असोत किंवा गेला बाजार काही प्रमाणात स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेत्या सुषमा अंधारे..
मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात कोकणवासींयाशी संवाद साधण्यासाठी आले होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "बाईमाणसाने बाईसारखेच बोलले पाहिजे, माणसासारखे बोलू नये. आम्हीही माझगावचे आहोत. माझगावचे त्यांचे पूर्वीचे नेते यांच्याकडून कशी एक्टिंग करायची हे आम्ही देखील शिकलो आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ॲक्टिंग करू शकतो. त्या
उ. बा. ठा. गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले, "सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? या बाईला काय बोलावे? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवले, भुंकायला नाही. काय बोलली ती?" असे म्हणत माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पक्षसावरण्यासाठी एक पाऊल पुढे येत असताना, पक्षातील महिला नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे समजते. शिवसेनेतील महिला पदाधिकारी आशा मामेडी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मामेडी या शिंदे यांच्या पक्षात जाण्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडीतील गटबाजी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसतो.
खासदार संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेतील विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. खासदार राऊतांच्या सुटकेवर टायगर इज बॅक, अशी सूचक प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत हे १०२ दिवस तुरुंगात राहिले हा आमच्यासाठी मोठा आदर्शपाठ आहे, असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले आहेत.
संदीप देशपांडे : महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार युवकांना रोजगार देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये छापून आली होती. या जाहिरातींवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सामनावर सर्वच स्तरांतून टीका होत असून ठाकरेंची निष्ठा केवळ पैशांवरच आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. गुरुवारी एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देणारी युती झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती झाली असल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाही वगैरे वगैरे अशी काही कारणं सांगितलीत. ते सांगत असताना काळलं तरी वळवणार कसं तर ते तुम्ही वळवताय अशा निरर्थक कोट्या करण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही. आता कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी युतीकारून हिंदुत्वाला तिलांजली दिली या कारणानेच शिवसेनेत उठाव झाला हे उघड आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वळचणीला उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली असल्यास काही वावग वाटायला न
राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणून आणि हिंदू देवी - देवतांची येथेच्छ निंदा नालस्ती करून आंबेडकरी चळवळीत नाव कमावलेल्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला लक्ष्य करत, त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन सरकार स्थापन करून काय क्रांतिकारक बदल घडवला? असा सवाल करत आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले
"बहीण संकटात असताना भाऊ मदतीला येतो, असे म्हटले जाते. पण भाऊ संकटात असताना बहिणीने मदतीला तत्परतेने यायला नको का ?" असे म्हणत नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे
सुषमा अंधारे शिवसेनेत; काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतरानंतर हिंदू समाजावर टीका करण्याच्या उद्देशाने एकाव्यक्तीने प्रश्न केला तेव्हा बाबासाहेबांनी आता मी हिंदू धर्मात नाही, त्यामुळे त्या धर्मावर मी टीका करण्यात वेळ घालवणार नाही, मी माझ्या समाजातील दोष दूरकरण्यासाठी तो वेळ सत्कारणी लावेल, अशा अर्थाचे बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य तुम्ही ऐकले अथवा वाचले असेल. पण बाबासाहेबांच्या नावाचा जप करणारे सुषमा अंधारे यांच्या सारखे अनेक लोक आहेत जे सतत हिंदू आणि हिंदू देवदेवतांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करत असतात. संविध