कैवल्यधाम या योग विद्येचे प्रशिक्षण देणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेने आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. दरम्यान, या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेकडून “योगिक विज्ञान” नावाचा माहितीपट जगासमोर ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, या माहितीपटाच्या माध्यमातून,योग हे शास्त्र आहे का? योगामागील विज्ञानाचा अभ्यास करून, योगाला सर्वसमावेशक पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत रुजवणे, हाच या माहितीपटाचा मुख्य उद्देश आहे.
Read More
भारतातल्या सहकार चळवळीची गेल्या ६० ते ७० वर्षांत अक्षरशः दशा झाली. या क्षेत्राला योग्य दिशा मिळाली असती, तर देशातील ग्रामीण भागापर्यंत प्रगतीचे मार्ग प्रशस्त झाले असते. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या विचारसरणीवर चालणार्या अन्य पक्षांनी हे क्षेत्र दुर्लक्षित ठेवले आणि त्या माध्यमातून केवळ भ्रष्टाचार पोसला.
“कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल,”असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना नुकतेच दिले.
बँकींग, विमा आणि कृषिपूरक उद्योगांत गुंतवणूकीसाठी प्रयत्न
देशभरातील कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा हा वाढतच चालला आहे. प्रशासनातर्फे हवी ती दखल केली जात आहे.
वरिष्ठ केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, रामविलास पासवान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनाच या भव्य विजयाचे श्रेय दिले
'हे कंपनीचे शेवटचे विमान आहे...आता आपण कधीच उड्डाण करू, शकणार नाही.', अशी उद्घोषणा पायलट मोहित कुमार यांनी केली आणि सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले. सर्व प्रवासी भावूक झाले होते. जेट एअरवेजच्या या शेवटच्या विमानातील प्रवासाचे क्षण सर्वजणांच्या स्मरणात राहीले.
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेट बॅंकेने पुढाकार घ्यावा, अशी विनंती 'नॅशनल एव्हीएटर गिल्ड' या वैमानिक संघटनेने केली आहे. सरकार आणि बॅंकांकडून जेट एअरवेजला पंधराशे कोटींचा निधी मिळण्यासाठी संघटनेने ही मागणी केली आहे. जेट एअरवेजवर आलेल्या या संकटामुळे कंपनीतील २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
खाजगी असल्याने ‘पडू दे बंद’ असा पवित्रा घेऊन चालणार नाही. रोजगार, दळणवळण आणि बँकांसाठीची वित्तीय हमी यासाठी जेटचे विमान पुन्हा उडालेच पाहिजे.
महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उदघाटन ५ मार्च रोजी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. तसेच यावेळी मत्स्यबीज केंद्र उदघाटन, मासेमारी बंदराचे भूमिपूजन, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मालकीचे घर वाटप, सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण , देवगड पवनचक्कीचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजने अंतर्गत मच्छीमार बांधवांना जाळी वाटप तसेच बंधाऱ्याचे भूमिपूजन, विक्रमी तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार, श्रमयोगी योजना लाभार्थी कार्ड वाटप, प्रधानमंत्री किसान य
केंद्र सरकारकडून स्टार्टअप्सना आकारल्या जाणाऱ्या एंजल टॅक्समधून सवलत देण्यात आली आहे. केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही स्टार्टअप गुंतवणूकीची मर्यादा आता २५ कोटींवरून वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार आयकर नियम १९६१ कलम ५२ (२) अंतर्गत गुंतवणूक सुलभ करण्यावर सरकारचा भर आहे.
दर वर्षी जानेवारीत होणारे आन्ट्रप्रोनरशिप-समिट (इ-समिट) हा आयआयटी मुंबईच्या इ-सेलचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
वाई क्षेत्र हे भविष्यकालीन प्रगती आणि विकासाचे इंजिन बनेल, असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी मुंबईत पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी जिल्हा नियोजन प्रकल्पाच्या (डीपीपी) दुसऱ्या टप्प्याचे मंगळवारी उद्घाटन केले.
पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे उद्घाटन मुंबईत नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. या परिषदेच्या जगभरातील सुमारे ८६ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन केले. याचसोबत केरळ हे ४ आतंरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य बनले.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत औद्योगिक धोरण व प्रोत्साहन खात्याने गोव्यात उद्या शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी ‘वार्षिक स्टार्ट अप इंडिया व्हेंचर कॅपिटल परिषद २०१८’चे आयोजन केले आहे.
जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) अहवालानुसार भारतात व्यवसाय करणे अधिक सोप्पे झाले
जागतिक आघाडीवर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत. तरीही भारतीय निर्यातीत सकारात्मक वाढ दिसून आल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकातील अतिरिक्त भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ऐरोली-कळवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती.
कुणी म्हणालं, कोकणचा कॅलिफोर्निया करू, कोणी अजून काही करू म्हणालं. पण, तो कसा, हे कोणीही सांगू शकलं नाही. कोकणात उद्योग आणावेत, की कोकणाची बागायती विकसित करावी, की पर्यटन विकसित करावं, यावरून अनेक वाद झाले. प्रत्यक्षात काहीच धड विकसित झालं नाही. बरं, याचं कुणाला काही पडलंदेखील नव्हतं. विकासासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी इथे कधी तीव्र आंदोलन वगैरे उभारलं गेलंय, असं झालं नाही..
एअर डेक्कन या विमान सेवा संस्थेतर्फे सेवा देण्यात येत होती. मात्र, सततच्या खंडित सेवेमुळे जळगावातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे आणि मुंबईहून जळगावला येणे कठीण झाले आहे.
विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेला नवा 'पॅसेंजर चार्टर ड्राफ्ट' सरकारने आज जाहीर केले आहे. यामध्ये प्रवाशांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रवाशांच्या तिकीट रद्द करण्यावरील सर्व दंड रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज दिली आहे.
विमान ३ हजार फुट उंचीवर गेल्यानंतरच या दोन्ही सुविधांचा वापर प्रवाशांना करता येईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
चीनकडून भारतात येणाऱ्या मालामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. परंतु या बदल्यात भारताकडून मात्र चीन फार कमी प्रमाणात मालाची आयात करत आहे.