२०२३ चे ‘माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.३४’ मागे घ्यावे, माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात राज्यभरातील माथाडी कामगार सहभागी होणार आहेत.
Read More
नोकरी करीत असताना विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ करीता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
मुंबई : विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा. माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केल्या.
राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.
येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळी, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील, साक्री ( जि. धुळे )च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
मिरज येथे तयार होणाऱ्या वाद्यांचे मार्केटिंग करण्यासाठी मॉल उभा करण्याबाबत प्रयत्नशील असून कलाकार मानधनाप्रमाणे तंतुवाद्य बनविणाऱ्यांना ही मानधन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिरज येथील दर्ग्याच्या दर्जोन्नतीचे काम चालू आहे. संगीताचे प्रशिक्षण, कार्यक्रम घेण्यासाठी मिरज येथे सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास आवश्यक निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चातर्फे २६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
इयत्ता ११ वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे व नागपूर सारख्या शहरात वार्षिक खर्चासाठी ४८ हजार ते ६० हजार रुपये अनुदान
समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.