अहंकार नसावा असे लोक सांगतात; पण आपला मान ठेवून लोकांनी पाया पडावे, असा अहंकार असतोच, यासाठी लोकांनी बोलावे तसेच आपले आचरण ठेवले पाहिजे. बोलणे एक आणि वागणे भलतेच, अशी मानसिकता नसावी. यासाठी परमेश्वरी सत्तेची सतत जाणीव ठेवून, परमेश्वराचे अनुसंधान ठेवावे लागते. त्याने वागण्यात फरक पडतो. भगवंताशिवाय कुणीही सर्वज्ञ नाही, हे एकदा मान्य केल्यावर आपल्या ज्ञानाचा गर्व राहणार नाही आणि आपले आचरण सुधारेल. परमेश्वरी सत्तेची जाणीव सतत राहावी म्हणून ‘भक्तिपंथेचि जावे’ तोच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
Read More
समर्थ रामदासाचा यांचा सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. सर्व संतामध्ये समर्थ हे फार वेगळे होते . ते ठामपणे बोलायला कचरत नव्हते. प्रवचन, कीर्तन या माध्यमातून ते स्पष्ट बोलत होते. समर्थानी धर्मावर भर दिला आहे. आपल्याकडे संत म्हणजे भक्ती समोर येते. पण समर्थाकडे भक्ती नव्हती असे नाही. पण प्रामुख्याने भक्ती पेक्षा ही त्यांनी धर्माला प्राधन्य दिले आहे.
समर्थांनी इ. स. १६३२ ते १६४४ या १२ वर्षांच्या काळात तीर्थाटनाच्या निमित्ताने सर्व देश पायी फिरून पाहिला. सूक्ष्म अवलोकन, अभ्यासूवृत्ती, विवेक, वैराग्य, सहृदयता, शिस्त, बुद्धिमता, लोकोद्धाराची तळमळ इत्यादी गुणांचा स्थायीभाव असलेल्या समर्थांचे देशाटन करताना एकंदर लोकस्थिती पाहून अंत:करण दु:खित झाले. या भ्रमंती काळात ‘भिक्षामिसे लहानथोर परीक्षून सोडावी’ या सिद्धांतानुसार वाटचाल करीत असताना त्यांनी अनेक प्रकारचे लोक पाहिले. त्यात काही साधेभोळे, मंद होते, तर काही लबाड, पापी, तोंडाळ, करंटे, भिकारी असेही लोकांचे न
नाठाळांना प्रसंगी डोक्यात काठी घालून समर्थांनी वठणीवर आणले आहे. आज समर्थ ग्रंथरुपाने वैचारिक प्रहार करीत आहेत. आपण त्यांचे अध्ययन करून त्याला सामोरे गेले पाहिजे. समर्थ विचारांचे फटके दासबोधातून आणखीही शोधता येतील. त्यासाठी साधकाची दृष्टी हवी.
रामदासांनी स्त्रियांविषयी आदर दाखवून स्त्रीत्वाचा सन्मान केलेला आहे. असेच त्यांच्या चरित्रावरून व दासबोधातील वेच्यांवरून दिसून येते. दासबोधातील स्त्री-पुरुष भेदासंबंधी विवरण महत्त्वपूर्ण आहे.
लहानपणी नवजात बालकाला काही कळत नाही. ते बालक अज्ञानदशेत असते. नंतर कालांतराने ती व्यक्ती आजूबाजूचे पाहून, अनुभवातून व दुसर्यांचे ऐकून शिकत जाते व शहाणे होते. शब्द तसेच भाषा यांच्याद्वारा विचार दुसर्यांपर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळे ऐकलेले किंवा वाचलेले शब्द माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात.
'भक्तिमार्ग' हा जरी या ग्रंथाचा मुख्य विषय असला तरी हा भक्तिमार्ग सर्वांगाने पुढे नेऊन त्याला 'प्रपंच-परमार्थ' जोडणारा आवश्यक घटक करावा आणि राष्ट्रभावनेची जाणीव देऊन राजकारणही त्यात समाविष्ट करावे, असे रामदासांच्या मनात होते. रामदासांनी आरत्या लिहिल्या, स्तोत्रे लिहिली आणि भक्तिपंथाची प्रशंसा केली.
दासबोध अभ्यासाची फलश्रुती कितीही चांगली असली तरी हा ग्रंथ ऐकणार्यांची, वाचणार्यांची जशी मनोवृत्ती असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होईल. स्वतःला विद्वान समजणारे काही टीकाकार हा ग्रंथ मुळातून न वाचताच त्यावर टीका करतात. त्यांना समर्थांचे सांगणे आहे की, जे मूळ ग्रंथ न वाचता केवळ मत्सर मनात ठेवून टीका करीत असतात, त्यांना मत्सराशिवाय दुसरे काय प्राप्त होणार? गुणांची पारख न करता ज्यांना फक्त दोषच पाहण्याची सवय असते, त्यांना तेच प्राप्त होणार यात संदेह नाही. जशी ज्याची वृत्ती तसे फळ त्याला मिळणार. अर्थात, हीसुद्धा
तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त झाली, धर्म नाश पावत आहे आणि हे सांभाळणारा कोणी दिसत नाही, ही खंत रामदासांच्या मनात होती. हे राष्ट्रीय कार्य शिवाजी महाराजांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून हा ‘महाराष्ट्रधर्म’ तुमची वाट पाहतोय असे रामदास म्हणाले.
रामदासांनी लोकांच्या धार्मिक विचारांची दिशा बदलून त्याला योग्य वळण दिले. रामदासस्वामी नुसतेच मारुती मंदिरे स्थापन करून रामजन्मोत्सव साजरे करीत नव्हते; तर त्यांना ‘धर्मरक्षी’ अशा राजाचा शोध घ्यायचा होता.
कुविद्येची माणसे समाजाचे अपरिमित नुकसान करतात. त्यांच्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते. समर्थांसारखे संत या अवगुणांचा पाढा वाचून लोकांना त्यापासून दूर राहण्याचा उपदेश करतात. कुविद्यालक्षणांचे अनेक प्रकार या समासात सांगून स्वामींनी अवगुणांचे भांडार दाखवले आहे, त्यागार्थ सांगितले आहे. त्यांचे वर्गीकरण करून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे.
चाफळला देऊळ बांधून झाले. मूर्ती मिळाल्या. मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. राममंदिरासाठी व तेथील रामनवमीच्या उत्सवासाठी चाफळची निवड हे रामदासांच्या दूरदृष्टीचे फलित होते.
कृष्णेच्या खोर्यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते.
हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील.