भैय्याजी जोशी यांची सुरेंद्र थत्ते यांना श्रद्धांजली
Read More
स्वदेशी जागरण मंच उभारणीच्या आरंभकाळात त्यांचे मोलाचे योगदान
सुरेंद्र थत्ते यांना २८ नोव्हेंबर, २०२० रोजी देवाज्ञा झाली. ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर मी सुन्न झालो. गेले अनेक दिवस माझ्या मनात या ना त्या प्रकारे त्यांची आठवण येत होती. त्यांना फोन केला पाहिजे, असेही वाटत होते. पण, गेल्या चार-पाच महिन्यांत सा. ‘विवेक’चे इतके विषय मागे लागले आहेत की, त्या विषयात गुंतल्यानंतर फोन करण्याचे राहून जायचे. त्यांच्याशी मला शेवटचे बोलता आले नाही, याची खंत मला दीर्घकाळ सोबत करीत राहील.