मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या कामांचा आढावा घेतला.
Read More
"लोकांनी मला सांगितले की धारावी खूप राजकीय आणि धोकादायक आहे. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ विटा आणि सिमेंटचा प्रकल्प नाही तर मुंबई बांधण्यास मदत करणाऱ्या लोकांचे उत्थान करण्याचा आहे", असे उद्गार गुरुवार,दि.६ रोजी लखनऊ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे मुख्य भाषण देताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतच्या आपल्या भावना आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे सूतोवाच ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला केले संबोधित धारावीच्या विद्यमान वैशिष्ट्यांवर आधारित बांधकाम करण्याचा, धारावीकरांसाठी जागतिक दर्जाचा जिल्हा निर्माण करण्याचा आणि हार्ट ऑफ न्यू मुंबई ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आमच्यासाठी सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प असल्याचे सूतोवाच केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हा धारावीकरांच्या जीवनमानात आणि 'रोजगाराच्या' विद्यमान परिस्थितीत बदल घडवून
Gautam Adani यांचा धाकटा लेक जीत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिवा शाहसोबत विवाह करणार आहे. यापूर्वी जीत अदानी यांनी मंगल सेवा करणार असल्याची शपथ घेतली आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी एक ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे.
Maha kumbh 2025 अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी २९ जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीसंबंधित दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांचे त्यांनी सांत्वन केले आहे. तसेच मृतांना आणि बाधितांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X पोस्टवर घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी आश्वासन दिले की सरकारच्या समन्वयाने, पीडितांना मदत केली जाईल असे त्यांनी नमूद केले होते.
श्रीलंका सरकारसोबत केलेला पवन उर्जा प्रकल्पाचा करार रद्द झाला नसल्याचं स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले. २४ जानेवारी रोजी एक निवेदन प्रस्तुत करून या बद्दल माध्यमांना माहिती देण्यात आली. काही दिवसांपासून मन्नार आणि पूनेरिन या ठिकाणी उभारले जाणारे प्रकल्प रद्द केले जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. परंतु अदानी समूहाने या संदर्भातील स्पष्टीकरण जारी केले आहे.
D. Gukesh बुद्धिबळपटू जग्गजेता डी. गुकेश याला खेलरत्न पुरस्काराने मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता अडाणी समूहाचे उद्योगपती गौतम अदानी हे डी. गुकेशच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. डी. गुकेश आणि त्याच्या पालकांना भेटून प्रेरणादायी वाटल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बुधवारी दि: २ जानेवारी २०२५ रोजी लिहिले.
Gautam Adani Meet Sharad Pawar देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा १२ डिसेंबर २०२४ रोजी ८५ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना केवळ राज्य आणि देशच नाहीतर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दुर्घाय़ुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे. शरद पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता देशातील उद्योगपती गौतम अडाणी यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आ
अदानी समुहावरचे आरोप आता षड्यंत्राकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. भारताने कायमच विकसनशील राहावे या विचाराने आजही हुकूमशाही प्रवृत्तीच्या संस्था, देश आणि माणसे कार्यरत आहेत. त्यांच्या दिमतीला आपले इमान कवडीमोल भावात विकलेले काही आपले राजकारणी आहेतच. अदानींवरील आरोपांचा आणि त्यामागील इकोसिस्टमचा हा आढावा...
भारताच्या उद्योग विश्वात आणि राजकारणाच्या वादात चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतम अदानी. अमेरीकेत त्यांच्या विरोधात केलेल्या आरोापमुळे एकाकी ही त्यांच्या नावाची चर्चा झाली आणि विरोधकांना सरकारवर आरोप करण्यासाठी नवीन विषय मिळाला. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने या बाबत पुरेसे स्पष्टीकरण दिले असून, नको त्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
(Mukul Rohatgi) भारताचे माजी महान्यायवादी आणि नियुक्त वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अदानी समूहावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत हे आरोप निराधार असल्याचा खुलासा केला आहे. यूएस फेडरल करप्शन प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत आरोप केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
गौतम अदानी ( Adani ) यांच्यावरील आरोपांमागे Deep Stateचा हात ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
हिंडेनबर्गने अदानी समूहाविरोधात आरोपांची राळ उडविली असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाकडून कंपनीविरोधात खोटा बातम्या पसरविण्यात आल्या आहेत. वकील संजय हेगडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून अदानी समूहाविरोधात बनावट प्रेस रिलीज प्रसिध्द केली आहे.
देशातील मोठा उद्योग समूह अदानी ग्रुपने बांगलादेशच्या अंतरिम सरकारला वीज प्रकल्पाला इशारा दिला आहे. बांगलादेशमधील राजकीय स्थित्यंतरानंतर नव्याने स्थापित झालेले युनुस सरकारला वादग्रस्त उर्जा प्रकल्पाची थकबाकी भरल्यास मोठे आर्थिक संकटास सामोरे जावे लागेल, असा इशारा अदानी समूहाने दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक कार उत्पादक कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्स प्रमुख एलन मस्क जगातील पहिले 'ट्रिलियनेअर' बनण्याची शक्यता एका अहवालातून समोर आली आहे. २०२७ पर्यंत एलन मस्क यांची एकूण संपत्ती १ हजार अब्ज डॉलरपेक्षा अधिक असेल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अदानी समूहाला दिलासा दिला आहे. कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बदराजवळील १०८ हेक्टर तृण जमीन गावकऱ्यांना परत करण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडून देण्यात आली होती. या निर्णयास आता सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती दिली आहे.
अदानी समुहाने आपले विस्तारीकरण सुरूच ठेवले आहे. त्यांच्या सिमेंटमध्ये भारतातील क्रमांक एकचे सिमेंट होण्याच्या महत्वकांक्षेला चार चांद लागले आहेत. कारण अदानी समुहाने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (PCIL) कंपनीचे १०४२२ कोटींना अधिग्रहण केले आहे. दोन वर्षांत अदानी समुहाचे हे तिसरे अधिग्रहण (Acquisition) आहे. यापूर्वी अदानी समुहाने अंबुजा सिमेंटचे अधिग्रहण केले होते.
निवडणूकीचा अनपेक्षित कलामुळे अदानी पोर्टस, व अदानी समुहाच्या इतर समभागात घसरण झाली आहे. परिणामी गौतम अदानी यांच्या कंपनीच्या बाजार भांडवलात मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील या समभागात २० टक्क्यांनी घसरण झाल्याने अदानी समुहातील समभागात ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अंबुजा सिमेंट,अदानी एंटरप्राईज, अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी ग्रीन, एनडीटीव्ही, अदानी टोटल गॅस या समभागात १२ ते १८ टक्क्यांनी नुकसान झाले आहे.
पेटीएम आपल्यातील काही हिस्सा अदानी समुहाला विकू शकतो असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते ते खरे नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.'अशी कुठलीही चर्चा सुरु नाही तरी आलेले वृत्त हे केवळ अनुमान असल्याचे ' कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच आम्ही कायम सेबी नियमांचे पालन करत असतो असेदेखील कंपनीने म्हटले होते.
या आर्थिक वर्षात अदानी एंटरप्राईज ८०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राईज समुहाने या आर्थिक वर्षात, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत नवऊर्जा, विमानतळ या व्यवसायावर आधारित ही गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.अदानी समुहाचे मुख्य आर्थिक अधिकारी सौरभ शहा यांनी ' आगामी वर्षात कंपनी ८०००० कोटींची भांडवली गुंतवणूक (Capex) करणार असल्याचे सांगितले आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) व विमानतळ व्यवसायात ५००० कोटींची गुंतवणूक समुह करणार आहे ' असे प्रसा
अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने आपले पाऊल फिलिपाईन्स देशात ठेवले आहेत. तिकडील मूलभूत सुविधा उभारण्यासाठी अदानी समुहाने मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर अदानी समुहाने फिलिपाईन्समध्ये मोठी गुंतवणूक करत २५ मीटर लांब पोर्ट बांधणार असल्याचे फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
गेल्या वर्षी अदानी समुहावर हिंडनबर्ग शॉर्टसेलर कंपनीने शेअर्सच्या किंमतीत फेरफार केले असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे थोड्या काळासाठी अदानी समुहाच्या समभागात घसरण होत त्याचा फटका समुहाला बसला होता. परंतु आता त्यावर मात करत अदानी समुहाने जोरदार वापसी करत आपले विस्तारीकरण सुरू केले आहे. याचा प्रत्यय म्हणजे ओरिसात कॉपरचा प्रकल्प उभारत तसेच अंबुजा सिमेंटमधील हिस्सेदारी वाढवत कंपनीवर नियंत्रण मिळवले याशिवाय आपल्या मध्यप्रदेश मधील प्रकल्पात रिलायन्सने अदानी समुहाशी केलेली गुंतवणूकीतून जवळीक पाहता गेल्या स
रिलायन्स व अदानी समुह एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी गुंतवणूक करण्यात कोणतीही गल्लत करत नसल्याचे दिसून येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अदानी समुहाच्या मध्यप्रदेश मधील उर्जा प्रकल्पातील २६ टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. ५०० मेगावॉट वीज उर्जा प्रकल्पातील २६ टक्के हिस्सा अंबानी समुहाकडे असणार आहे. बाजारातील वृत्तानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज अदानी समुहाची उपकंपनी महान एनर्जी लिमिटेड (Mahan Energy Limited) मधील ५ कोटी इक्विटी समभाग (शेअर्स) खरेदी करणार आहेत. या समभागाचे मूल्य एकूण ५० कोटी रुपये असल्याचे सा
वृत्तसेवांनी दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समुहाकडून आता संरक्षणात क्षेत्रातील मोठ्या संधीची वाट पाहत नजीकच्या काळात संरक्षणात मोठी गुंतवणूक करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३००० कोटींची अदानी एरोस्पेस व डिफेन्स एम्युनेशन कारखाना सुरू करणार असल्याची माहिती वृत्तपत्राने दिली आहे
अदानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठा रिन्यूएबल ऊर्जा उत्पादन एनर्जी पार्क उभारण्याचे जाहीर केले आहे. गुजरात येथील खावडा येथे ५५१ एमडब्ल्यू क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे. या ऊर्जा प्रकल्पाचे तब्बल ३० गिगावॉट ऊर्जा तयार करण्याचा संकल्प असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ५ वर्षांनी काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असणार आहे. १६.१ दशलक्ष घरांसाठी आवश्यक ती ऊर्जेची मागणी यातून तयार होत असल्याची माहिती कंपनीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.
देशातील छोट्या शहरात विशेषतः ग्रामीण भागात सौर उर्जेला प्रोत्साहन केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना यासंदर्भात तरतूद केली आहे. रुफटॉप सौरउर्जा पॅनेल लावण्याकरिता येणाऱ्या खर्चात घट दिसून आली आहे. त्याचबरोबर, अर्थमंत्री बजेट भाषणात म्हणाल्या, तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक ३५ टक्क्यांपर्यंत रुफटॉप सौर पॅनेल लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर तयार करण्यासाठी २५ कोटी रुपयांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या विनंतीवरून गौतम अदानी यांनी तातडीने २५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला.
दि. २३ डिसेंबर रोजी बारामतीतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, प्रतिष्ठानने एक प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र बदलत असल्याने बदल स्वीकारू शकेल असा वर्ग निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिले केंद्र उभारत आहोत. या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी आता निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने मला गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी संस्थेला २५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी यांच्या शेयरमध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे. तर अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेयरमध्ये सुद्धा तेजीचे वातावरण आहे.
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपाची कबुली उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आता उघड झाले आहे.
अदानी हिंडनबर्ग विषय माध्यमात चर्चेत असतानाच असतानाच अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अदानींवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे.यावरून राजकारण तापले असतानाच अनेक नेत्यांच्या यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी दुबे यांनी आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली होती. ओम बिर्ला यांच्याकडे सादर क
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आले आहे. ही भेट कशासाठी असेल यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
३७० कलमाखालील असलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असल्याचे कळते आहे. मिडिया रिपोर्टनुसार कलम ३७० चे उल्लंघनाच्या बाबतीत जनहित याचिकेवर पुढील वेळेस सुनावणी होणार आहे. शॉर्टसेलर हिंडनबर्गने जानेवारी २३ मध्ये शेअर्स किंमतीचा हाताळणी गैरव्यवहार बदल गंभीर आरोप केले होते. अदानी समुहाने आरोप फेटाळून लावले तरी स्वतंत्र ३ जनहित याचिकेवरील सुनावणीत मागच्या वेळेस सेबीने तपासाची मुदत वाढवून मागितली होती. तांत्रिक आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहले की," मोदीजींनी चंद्राच्या भागांना तिरंगा आणि शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे. आता अदानी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करेल आणि निविदा न काढता चंद्रावर सपाट पृथ्वीचे दर्शनी भाग बांधण्याचे अधिकार प्राप्त करेल. तिथे मुस्लिमांना परवानगी दिली जाणार नाही आणि फक्त शाकाहारीच राहतील"
मुंबईच्या धारावीतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचे काम सरकारने ‘अदानी’ समूहाकडे दिले आहे. साडेसहा लाख झोपडीधारकांना पुढील सात वर्षांत घरे मिळणार आहेत. त्यानिमित्ताने या प्रकल्पाचे स्वरुप तसेच धारावीकरांचे आक्षेप यांचा आढावा घेणारा हा लेख...
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गवर गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गने जो अहवाल सादर केला होता तो कंपनीला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते, असा आरोप गौतम अदानी यांनी केला आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी खोटी माहिती देऊन हा अहवाल तयार करण्यात आला होता जेव्हा समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस देशातील सर्वात मोठी फॉलो ऑन पब्लिक इश्यू घेऊन येणार होती, त्यावेळीच हा अहवाल कंपनीची बदनामी करण्यासाठी सादर करण्यात आला.
देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या घसरणीचा काळ फार लोटला नाही. हिंडेनबर्गने दिलेल्या अहवालामुळे ही परिस्थिती गौतम अदानी यांच्या आली होती. मात्र आता एलआयसीने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यात विमा कंपनीचा नफा (एलआयसी नफा) ४६६ % वाढून १३४२८ कोटी रूपये झाला आहे. दुसरीकडे, गौतम अदानींचे नाव श्रीमंतांच्या यादीत पुन्हा टॉप २० मध्ये आलंय.
मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा बीकेसीत आज पार पडली. या सभेतून उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, " गौतम अदानींची चौकशी करू नका तर त्यांचे संपूर्ण आत्मचरित्रचं शालेय अभ्यासक्रमात लावा, श्रीमंत कसं व्हायचं." असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाचं लोकार्पण आज दि. २७ एप्रिल रोजी नागपुरात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उद्योजक गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी अदाणी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काही सवाल विचारलेत. अदाणी प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी होतेय. या चौकशीला सुरुवातीला शरद पवार यांनी विरोध केला. मात्र, नंतर विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. त्यानंतर अदाणी-पवार यांची भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यावर. शरद पवार आणि अदानींचे संबंध जुने आहेत. कुणी कुणाला
दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच मविआ आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमुळे ‘मविआ’च्या ऐक्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे.पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चाही झाली. त्यामुळे या भेटीनंतर आता कुठल्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दि. १२ एप्रिल रोजी दिल्लीत जाणार होते. मात्र काही कारणाने त्यांना जाता आले नाही. पंरतू दि.१३ एप्रिल रोजी शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेच्या घरी दाखल झालेले आहेत. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गौतम अदानी यांच्यावर पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत पवारांची ही पहिलीच बैठक आहे.या बैठकीतून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. रात्री साडेआठ वाजता भेटी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीच
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ११एप्रिल रोजी भेट झाली. उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असून मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक
नवी दिल्ली : राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंबाचे परदेशातील ‘अनिष्ट’ उद्योगपतींशी संबंध असल्याचे विधान माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. त्यामुळे आता अशा परदेशी लोकांच्या आदेशावरून राहुल गांधी मोदीविरोधी राजकारण करतात का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचे म्हटलं होतं. शिवाय गौतम अदानी यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले होते की, अदानी यांचं उर्जा क्षेत्रातील योगदान मोठं आहे. पवार यांच्या या विधानावरुन विरोधी पक्षांत मतभेद निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या अधिक जवळ येत असल्याचे म्हटले जात आहे.
फोर्ब्सने नुकतेच अब्जाधीशांची यादी जाहिर केली आहे. या अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत भारताचाही समावेश असून भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, देशातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती $६७५ अब्ज आहे. तरी २०२२ च्या तुलनेत ७५ अब्ज डॉलर कमी संपत्ती आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या लिस्ट २०२३ नुसार भारतात १६ नवीन अब्जाधीश आहेत.
पंतप्रधान अदानींना का वाचवतात? सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का? असा सवाल करत उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.
‘हिंडेनबर्ग’ अहवालाद्वारे कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची बदनामी करणे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भोवणार असल्याचे दिसते. या प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदीय समितीसमोर राहुल गांधी यांनी विशेषाधिकार सूचनेचा भंग केल्याप्रकरणी समितीसमोर आपले म्हणणे मांडले. त्यानुसार कारवाई झाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केलं. मात्र मोदी भाषणाला उभे राहण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला.