Shri Swami Samarth अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचा उल्लेख त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी केला. सहकारी तत्त्वावर चालणारी आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राबविलेल्या आठवडी बाजाराची ही कंपनी युवा शेतकऱ्यांकडून कृषीमालाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आली आहे. हा कृषिमाल मुंबईच्या विविध भागांमध्ये आठवडी बाजारामध्ये विकला जातो, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत तर मिळतेच पण ग्राहकांनाही किफायतशीर भावात ताजी फळे आणि भाजीपाला उपलब्ध होतो.