छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात दि. १२ मे रोजी पत्रकार परिषदेत राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी अर्ज भरणार असून १० अपक्ष आमदारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान, विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने ‘सिडको’ नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.
कोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विकासकामासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केली कारवाईची मागणी केतील घोटाळ्यांमुळे खातेदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कर्नाळा बँकेत ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी स्थानिक आमदार व संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत वारंवार पोहोचवला जात आहे. मात्र, सरकार खातेदारांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आक्रमक होता. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी
अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटाच्या काळात भाजप आमदार महेश बालदी उरण तालुक्यातील गरजवंतांच्या पाठीशी उभे राहिले. महेश बालदी व भाजप कार्यकर्ते तसेच सहकार्यांनी जीवनावश्यक वस्तू, मास्क, ‘पीपीई’ किटचे वाटप केले, तसेच स्थलांतरित मजुरांनाही धीर दिला व त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. परिणामी, तालुक्यातील सर्वांच्याच मनात कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास निर्माण झाला.