स्वयं पुनर्विकास योजनेबाबत दरेकर समितीने शासनाला अहवाल दिला आहे. तो शासनाने स्वीकारला असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल मान्य करून नवीन कायदा तयार करून स्वयं पुनर्विकास संकल्पना अतिशय गतीने सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी संपूर्ण राज्यात लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सकारात्मक उत्तर शासनाकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अल्पकालीन चर्चेवेळी दिले. तसेच दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास अहवालाची शासनाने परिपूर्ण अंमलबजावणी केली तर शहरातील माणूस बाहेर जाणार नाही आणि त्याचे पुण्य निश्चितपणे सरकारला
Read More
( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd