Cannes Films Festival 2025 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
Read More
अनंत औषधी उपयोग असलेली, वातावरण शुद्ध ठेवणारी ‘तुळस’ आज जवळजवळ प्रत्येक भारतीय माणसाच्या घरी दिसते, ती तिच्या धार्मिक पावित्र्यामुळेच.
‘अश्वत्थ वृक्ष’ म्हणजे पिंपळाचं झाड. भारतीय संस्कृतीतील पूजनीय वृक्षांमध्ये हा सर्वोच्च स्थानी आहे. ‘अश्वत्थम् जलं अस्य अस्ति, मूले सिक्तत्वात ।’ अर्थात, मुळात शिंपडल्यामुळे ज्याचे पाणी दुसऱ्या दिवशी टिकत नाही असा वृक्ष म्हणजे ‘अश्वत्थ’ होय, अशी या वृक्षाची व्याख्या केली गेली आहे. अश्वत्थाची एक उत्पत्ती तैत्तिरीय ब्राह्मणात दिली आहे ती अशी, एकदा अग्नी देवांपासून निघाला व त्याने अश्वरूप धारण केले. तो त्या स्वरूपात एक संवत्सर अश्वत्थ वृक्षावर राहिला, म्हणून त्या वृक्षाला ‘अश्वत्थ’ म्हणू लागले.
गेली हजारो वर्षे वड, पिंपळ, बेल, तुळस, आघाडा, कदंब, पारिजातक, चंदन, रुद्राक्ष, आंबा, अशोक, रुई, शमी, आपटा अशा झाडांचं अस्तित्व टिकविण्यात या झाडांप्रती असलेल्या धार्मिक भावनांचा मोलाचा वाटा विसरून चालणार नाही.