उगवत्या सूर्याचा देश अर्थात जपानचा येत्या काही वर्षांत अस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील सर्वात विकसित देशांच्या यादीमध्ये जपान अग्रक्रमावर. दुसर्या महायुद्धादरम्यान जपानला नामोहरण करण्यासाठी बलाढ्य अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला. यात हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराख झाली. देशाची राखरांगोळी होऊनही जपानने राखेतून भरारी घेत जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला. सध्या जपानकडे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जाते. परंतु, जपान दिवसेंदिवस कमजोर होत चालला आहे.
Read More