नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More
मागच्या एका दशकात ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या सरकारी योजनांमुळे देशात एक ‘स्टार्टअप क्रांती’ झाली. त्यात नुकताच दि. १६ जानेवारी रोजी ‘स्टार्टअप दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे निमित्त साधून ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड’ (डीपीआयआयटी)ने स्टार्टअप्सवर एक अहवाल प्रकाशित केला. त्याचेच या लेखात केलेले आकलन...
स्टार्टअप्सना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअपची संस्कृती तयार करण्यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. 'स्टार्टअप इंडिया'ला सहा वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातल्या अनेक तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे कौतुक केले. स्टार्टअपची संस्कृती देशात दूरवर पोहोचावी या हेतूने १६ जानेवारी हा 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला.