Congress “आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत,” असे कर्नाटक सरकारने म्हटले. तरीही प्रत्यक्षात मात्र हिंदूंची मुस्कटदाबी सुरूच आहे. ‘सीईटी’ परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला. मात्र, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला 15 मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले.
Read More
चेन्नई : तामिळनाडूतील कोयंबटूर येथे इस्लामी आतंकवादी एस ए बाशा याच्या अंत्ययात्रेला २००० पोलिस आणि २०० आरएएफ जवानांची तैनाती करण्यात आली. एसए बाशाला कोयंबटूरमध्ये १९९८ साली झालेल्या धमाक्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाते. ज्याने ५८ भारतीयांना जीवे मारले त्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला स्टॅलिन सरकारच्या ( Stalin Govt. ) अनेक आमदार-नेते-अभिनेते आणि अल्पसंख्याक जमावाने हजेरी लावली. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांची पदयात्रा राज्यातील २३४ विधानसभा क्षेत्रांना भेट देणार आहे. केंद्रातील सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. त्याशिवाय द्रमुकच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन स्टॅलिन सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण यांवर प्रहार करणारी अण्णामलाईंची पदयात्रा तामिळनाडूमधील नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी ठरु शकते.
तामिळनाडूमध्ये मागील अनेक वर्षांपासून बळजबरीने धर्मांतरण केल्याची कुठलीही घटना घडली नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅलिन सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केले आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मप्रसारामध्ये जोपर्यंत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब होत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. लोक ज्या धर्माचे पालन करू इच्छितात, तो धर्म निवडण्याचा त्यांना अधिकार असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे