आदित्य एक संगणकतज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ. गेले कित्येक आठवडे तो आपले आजोबा आणि त्यांच्या मित्रांना, ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या विविध अंगांबद्दल समजावून सांगत होता. साध्या भाषेतले हे वर्णन ऐकून जयंतरावांचे अनेक मित्र या चर्चेत सहभागी होत होते. आज त्यांचे एक मित्र डॉटर देशमुख चर्चेला आले होते. डॉटर देशमुख म्हणजे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ. त्यामुळे आज चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीबद्दल होणे साहजिक होते.
Read More
न्यायव्यवस्था हा कोणत्याही लोकशाही देशामध्ये महत्त्वाचा आधारस्तंभ. भारतासारख्या देशात तर या न्यायव्यवस्थेवर असलेला कामाचा हा ताण प्रचंडच आहे. अशावेळी ‘एआय’चा वापर विवेकाने करण्याचे धोरण भारतीय न्यायव्यवस्थेने स्वीकारले आहे. न्यायव्यवस्थेमध्ये ‘एआय’चा वापर कसा होतो, याचा घेतलेला हा मागोवा...
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
Artificial Intelligence पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका या विषयावर उद्या (दि.२१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.) यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे.
प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यास
(state will need artificial intelligence CCTV cameras Minister of State Home Yogesh Kadam) राज्यात कृत्रिम बुद्धीमत्ताधारित (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) ‘सीसीटिव्ही कॅमरे’ लावण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहेत, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार होईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी विधानसभेत दिली
‘AI'’ची सर्वत्र चर्चा आहे. अर्थात त्याचा इतिहास जुना असला, तरी गेली अनेक दशके सामान्य माणूस या ना त्या रुपाने ‘एआय’ वापरत आहेच. सामान्यांच्या जीवनात आधी एआय कसे आले, याचा घेतलेला हा आढावा...
कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होत चालला आहे, यावर दुमत असायचे कारण नाही. देश विदेशातील बाजारपेठांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत वेगाने होणारे बदल आत्मसात करत, माणूस आपल्या भविष्याचा पाया रचतो. दुसर्या बाजूला प्रगत तंत्रज्ञानाबद्दलच्या अज्ञानामुळे साशंकता आणि भीती या दोन भावना, प्रामुख्याने लोकांच्या मनात घर करतात. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचा विचार करत असतानाच, आपसूकच हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात माणसांची जागा घेईल, हा विचार सर्वप्रथम केला जातो. या बद्दलची चिंता आणि चिंतन स्वाभ
'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात येणारी 'इनोव्हेशन सिटी’ देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्समधील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला संबोधित करताना, या क्षेत्रातील भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेखही मांडला. पण, केवळ भारतापुरता संकुचित विचार न करता, विश्वकल्याणासाठी ‘एआय’ची उपयोगिता, सुरक्षितता आणि जागतिक सहकार्य याबाबतही पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन उद्बोधक ठरावे.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता मागच्या अनेक दशकांपासून आपल्या विचारविश्वाचा भाग होता. दैनंदिन जीवनात त्याचा वापर आज आपल्याला बघायला मिळतो. मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले आहे ज्येष्ठ विज्ञान लेखक बाळ फोंडके यांनी. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या परिसंवादात ते बोलत होते.
तंत्रज्ञान सतत बदलत असते, त्यात काळानुरुप नवनवे बदल होत असतात. सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) या तंत्रज्ञानाचे आहे. जगातील अनेक देश या तंत्रज्ञानावर आपले प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतानेसुद्धा याबाबत गती घेतली असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रात केला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा...
कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धि
‘भावनिक बुद्धिमत्ता’ हा शब्द बरेचदा आपण वाचतो, ऐकतोही. पण, त्याविषयी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला फारशी माहिती नसते. तेव्हा, आजच्या लेखातून ‘भावनिक बुद्धिमत्ते’च्या विश्वात डोकावून ही संकल्पना समजावून घेऊया.
( PM Narendra Modi ) "भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभुतपूर्व वेगाने काम करत आहे. जग चिंतेने बुडालेले असताना भारत आशेचा किरण दाखवत आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद या कार्यक्रमात सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या अंर्तगत पंतप्रधानांनी मिशन कर्मयोगीच्या यशावर भाष्य केले आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी अभिनव विचार आणि नागरिक केंद्रीत दृष्टीकोन अवलंबण्याची गरज असल्याचे म्हटले.
Artificial intelligence आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीवर भर दिला जातो. मोठे रस्ते प्रकल्प, गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण विमानतळे, मोठमोठी बंदरे आणि सागरीसेतू, मेट्रो आणि अद्ययावत रेल्वे प्रकल्पांचे जाळे उभारले जाते आहे. हे प्रकल्प जलद आणि अद्ययावत असावे, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अभियांत्रिकी कौशल्याचा कसही लागतो. हीच कौशल्ये प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अधिक व्यापक करत ‘आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी महासंघ’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ आणि ‘ईव्हाय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लीडर’ने
केंद्राच्या इंटेलिजन्स ब्युरो कडून मुंबईला हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सध्या तंत्रज्ञानातील परवलीचा शब्द. त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला, तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने जगभरातील विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका प्रकल्पावर काम करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही वर्षांत जितकी प्रगती होत आहेत तितक्याच प्रमाणात सायबर हल्ले व सायबर फसवणूक, गुन्हे, गैरप्रकार वाढले आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने नवीन पाऊले उचलली आहेत. यामध्ये सरकारने हॅकर्स पासून वाचवण्यासाठी 'डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' ची निर्मिती करण्यासाठी ठरवले आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात कार्यरत कंपन्या या डेटाचा वापर अगदी खुबीने करताना दिसतात. त्यातच ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ व ‘एस अॅण्ड पी मार्केट इंटेलिजन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर झालेल्या अहवालात, लघु व मध्यम उद्योगांकडूनही व्यवसायवाढीसाठी डेटाचा वापर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानिमित्ताने ‘डेटा इंटेलिजन्स’ आणि यशस्वी लघु-मध्यम उद्योगांच्या पाऊलवाटा यांचा धांडोळा घेणारा हा लेख...
नैराश्य हे केवळ प्रौढांपुरते मर्यादित नाही, तर हल्ली विद्यार्थीदशेतही कित्येकांना नैराश्याने, अपयशाने ग्रासलेले दिसते. त्यातूनच मग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत काही तरुण-तरुणींची मजल जाते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव आपले पाल्य नैराश्येकडे झुकण्याचे पुसटसे देखील संकेत असतील, तरी पालकांनी तातडीने त्यांच्याशी संवाद योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. यासंबंधी पालक आणि पाल्यांना मार्गदर्शन करणारा लेख...
निवडणूकीनंतरचा काळात भांडवल खर्च, खाजगी वापर, व गुंतवणूक या तिन्ही त्रिसूत्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. एस अँड पी ग्लोबल इंटेलिजन्स या कंपनीने दिलेल्या अहवालात ही पुढील माहिती समोर आली आहे.अहवालात म्हटल्याप्रमाणे, या तिन्ही विभागात मोठी वाढ आल्याने अर्थव्यवस्थेतील घोडदौड वेगाने होण्याची शक्यता आहे. विशेषतः देशाच्या आर्थिक धोरणात नवउर्जा, इलेक्ट्रोनिक, टेक्स्टटाईल,डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिकस, अन्न उत्पादन या मूलभूत क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नोंदवली गेली आहे.
मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या हायटेक प्रचारासह पारंपरिक अर्थात पोस्टर, बॅनर आणि रिक्षेवर भोंगा लावून केला जाणार प्रचारही रंग धरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. अनेक पक्ष विविध हायटेक तंत्रांचाही वापर करतात. परंतु निवडणूक प्रचाराची जुनी सूत्रे अजूनही वापरली जात आहेत. पोस्टर्स आणि बॅनरसह अनेक प्रकारचे प्रचार साहित्य दिल्लीतील प्रत्येक गल्लीत दिसत आहे. निवडणुका तोंडावर आल्याने ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रचारालाही वेग आला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत खोटे व्हिडिओ खोटे फोटो वायरल होण्याची शक्यता असते. अशातच काही प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आल्याने ओपन ए आय (Open AI) कंपनीने युएस स्थित कंटेंट प्रोव्हिंस अँड ऑथेन्टिसिटी कमिटीशी हातमिळवणी केली आहे. आगामी काळातील 'डिपफेक' व्हिडिओ रोखण्यासाठी कंपनीने ही नवी खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. ओपन ए आय ही चाट जीपीटी बनवणारी मातृसंस्था आहे. याशिवाय भारतातही मोठे पाऊल उचलत कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी देखील केली आहे.
भविष्यात वारा कुठल्या दिशेने वाहत आहे, याची चाचपणी शेअर बाजारात केल्यास बाजाराचे अर्थचक्र समजून घेण्यास निश्चितच मदत होते. यापूर्वी बाजारात अनेक प्रकारचे, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्स दाखल झाले. परंतु, एक मुद्दा अजून तसा दुर्लक्षित आहे, ते म्हणजे ’तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग’ याच मुद्याचा आढावा घेणारा हा लेख...
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असूननुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे (Artificial Intelligence) पुष्कर जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहे
विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी, भारत फिलीपाईन्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीला बळ देत आहे. चीनच्या अरेरावीला का रे, असा उत्तर देणारा भारत आणि फिलीपाईन्स हे देश एकत्र येणे म्हणूनच गरजेचे. भारताने फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे देत प्रदेशात योग्य तो संदेश दिला. म्हणूनच या दोन्ही देशांची तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी महत्त्वाची...
तेराव्या इंटरनॅशनल कन्व्हेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर ऑफ इंडियामध्ये सेबीचे अधिकारी कमलेश चंद्र वर्शनी यांनी बोलताना सेबीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करण्यात आल्याचा दुजोरा प्रसारमाध्यमांना दिला आहे. याप्रसंगी बोलताना आर्थिक गैरव्यवहार,घोटाळे,आर्थिक अनियमितता आढळल्यास यावर सेबी ए आय माध्यमातून माहिती मिळवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एआयचा वाढता वापर व उपयुक्तता लक्षात घेता आर्थिक व्यवस्थापनात ए आयचा शिरकाव याबद्दलची नांदी आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या महत्वाचा क्षेत्रातील उलाढाल महत्वाची ठरत असताना भारतातील उद्योजक देखील याबाबत मागे नाहीत. कारणही तसे महत्वाचे आहे कारण मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मोठी म्हणून ओळख असणाऱ्या रिलायन्स कंपनीने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादन निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. ' भारत जीपीटी ' नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) मॉडेल तयार केले जाणार आहे. रिलायन्सचा वरदहस्त असल्याने यात मोठी गुंतवणूक अंबानी कुटंब करण्याची चिन्हे वर्तवली जात आहे.
सध्याच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वादळ घोंघावत असतानाच मुख्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा चालू झाली आहे. या ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वर मतमतांतरे असली तरी त्याचा वापर प्रत्येक औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वेगाने वाढला आहे. परिणामी नवीन नोकरी मिळविताना आपले एक आय कौशल्य तपासण्यासाठी नोकरीचे उमेदवार आपली कंबर कसत आहेत. अशाच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या पाठिंब्यावर ए आय कंपनी ' ओपन एआय' ने एक आय मार्फत व्हिडिओ निर्मिती करणार असल्याचे घोषित केले आहे.
महाराष्ट्र सरकार आणि गुगलमध्ये गुरुवारी एक सामंजस्य करार झाला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने सात विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उपयोग करुन वेगवेगळ्या प्रकारचे अप्लीकेशन्स तयार करण्यात येणार असून यातून नागरिकांचे जीवन चांगलं होण्यासाठी मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासानंतर डीपफेकचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हाँगकाँगमधील एक कंपनी आता चक्क डीपफेकमुळे आर्थिक फसवणुकीला बळी पडली आहे. डीपफेक कॉलच्या मदतीने त्या कंपनीला २१२ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या, डीपफेक वापरून फसवणूक करणाऱ्याने कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचा (सीएफओ) फोटो वापरून कार्यालयातील कर्मचाऱ्याला कॉन्फरन्स कॉल केला आणि त्यांना पैसे पाठवण्यास सांगितले. व्हिडीओ कॉलवर सीएफओला पाहिल्यानंतर कर्मचाऱ्याने दि. २
‘फॉक्सकॉन’चे सीईओ आणि तैवानी नागरिक असलेले यंग लिऊ यांना नुकताच ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘पद्मभूषण’ पुरस्कार यादीतील ते एकमेव विदेशी नागरिक. लिऊ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करणे हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील आजवरच्या योगदानाचा हा सन्मानच. तसेच या पुरस्काराने चीनला शह देण्याबरोबरच ‘फॉक्सकॉन’च्या भारतीय गुंतवणुकीचा मार्गही अधिक प्रशस्त केला आहे. त्याचे आकलन...
भारतीय संस्कृतीत मातेला फार मोठे महत्त्व आहे. मातेची प्रतिमा कोमल हृदय, मृदू, दयाळू दाखविण्यात आली आहे, तर दुसरीकडे मातेच्या क्रूर कृत्याचाही उल्लेख वेळोवेळी आढळतो. त्यातूनच ‘माता न तूं, वैरिणी’ असेही म्हटले जाते. मातेची ही विविध रुपे आजच्या युगात दिसून येतात. बुद्धिजीवी व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे, नावलौकिक प्राप्त केलेली सूचना सेठ या महिलेने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केली. सूचना सेठ हे नाव कार्पोरेट जगतात सुपरिचत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर तयार करण्यासाठी २५ कोटी रुपयांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या विनंतीवरून गौतम अदानी यांनी तातडीने २५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला.
राजस्थान पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात आलेल्या व्यक्तीचा पर्दाफाश करत सदर व्यक्तीस आयबीच्या ताब्यात दिले. बांगलादेशचा महमूद आलम ही व्यक्ती किशोर कुमार म्हणून भारतात राहत होता. तो उपचारासाठी रुग्णालयात आला तेव्हा त्याला राजस्थान पोलिसांनी पकडून आयबीच्या ताब्यात दिले.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे. त्यामुळे एआयच्या जागतिक नियमनावर एकत्र काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुन्हा सुरु करण्यासाठी कॅनडातील आठ शहरांतून कट रचला जात आहे. कॅनडातील काही गुरुद्वारांचाही यासाठी वापर केला जात आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिली आहे. त्यासोबतच खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे.
‘रोबोटिक्स’ हे अतिशय वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान. केवळ पाश्चिमात्त्य देशांतच नाही, तर भारतातही ‘रोबोटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित तंत्रज्ञानाला गतिमानता प्राप्त झालेली दिसते. मोठमोठ्या कंपन्यांसह अनेक स्टार्टअप्सही ‘रोबोटिक्स’च्या या विश्वात आपले नजीब आजमावत आहेत. नुकतेच केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रोबोटिक्स क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय धोरण नागरिकांच्या अभिप्रायासाठी खुले केले आहे. भारत सरकारच्या या ‘मिशन रोबोटिक्स’निमित्ताने या तंत्रज्ञानाचा, त्या
देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट वाँलेट कंपनी पेटीएमने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्याबरोबरच भारतीय स्टार्टअपला बळ देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्याचे ठरवले आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी संचालक विजय शर्मा यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी ही नवी गुंतवणूक केली जाऊ शकते. कॅटेगरी २ च्या Alternate Investments Funds ची निर्मिती कंपनी करणार आहे.या निधीची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असणार आहे.
भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. त्यात सांस्कृतिक आणि बौद्धिक बाबींचा प्रकर्षाने समावेश आहे. त्यात अर्थशास्त्राची देणगीसुद्धा भारतानेच जगाला दिली. भारतात कधीकाळी एवढी सुबत्ता होती की, येथे सोन्याचा धूर वाहत होता, असे म्हटले जाते. हे त्रिवार सत्य असून, त्यावेळी भारत आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असेल, याची कल्पनाही करवत नाही. पारतंत्र्याचा काळ, त्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि गमावलेला स्वाभिमान यांमुळे आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अगदी तळाशी गेली होती.
गुजरात एटीएसने दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. त्याचवेळी त्याच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. यासाठी एटीएस विविध ठिकाणी छापे टाकत आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करत होता आणि महत्वाची माहिती भारतात हस्तांतरित करत होता.
स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मान
भारताच्या आयटी क्षेत्राने जगभरात आर्थिक मंदी असतानाही महसुलात वाढ नोंदवली आहे. भारतात होत असलेले वाढते ‘डिजिटलायझेशन’, ‘एआय’ तसेच ‘मशिन लर्निंग’चा वाढता वापर आणि ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची होत असलेली विक्रमी वाढ आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे. त्याविषयी...