बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोध
Read More